ETV Bharat / state

जालना : भोकरदन तालुक्यात आज पुन्हा आढळले 31 कोरोना रुग्ण - जालना कोरोना बातमी

भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी या गावात आधीच या गावात 23 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. आता पुन्हा 31 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, एकूण 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

thirty one corona patients found today in bhokardan in jalna
जालना : भोकरदन तालुक्यात आज पुन्हा आढळले 31 कोरोना रुग्ण
author img

By

Published : Feb 22, 2021, 2:00 AM IST

भोकरदन (जालना) - भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी या गावात पुन्हा 31 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. आधीच या गावात 23 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे या गावातील 200 नागरिकांच्या ऑंटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 31 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, एकूण 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जाळीचा देव येथील मंदिर परिसर बंद -

जाळीचा देव हे महानुभाव पंथातील पवित्र मंदिर आहे. परंतु मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बाधित आढळल्याने मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. गावातून जाणारे विविध ठिकाणाचे चोर रस्तेदेखील बंद करण्यात आले आहेत. आरोग्य पथकांडून तपासणीचे काम सुरू असून गावातील नागरिकांनी सुद्धा आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभाग व प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा - मुंबई : 12 कोटींच्या 25 किलो एमडी या अमली पदार्थासह आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.