मुंबई - आरोग्य भरतीतील परीक्षा ( Health Department Exam ) बाबत विधिमंडळात चर्चा ( Discussion In Assembly ) झाली असून, पुनर्परीक्षेबाबत ( Health Department Reexam ) पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून, यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून, आमचा हेतू शुद्ध आहे असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटीचा ( Health Department Paper Leak ) तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत. त्यासाठी सीबीआय चौकशीची गरज (CBI Investigation Health Department Paper Leak ) नाही, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. ते जालन्यात बोलत होते. इथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं.
केंद्राने बूस्टर डोसचा निर्णय घ्यावा
केंद्राने आता कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस ( Covid Vaccination Booster Dose ) देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचा असून, याबाबत आता निर्णय घ्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली. 12 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण ( Childrens Vaccination ) करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून, याबाबत निर्णय व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले.
शाळा सुरूच राहणार
शाळा सध्या सुरूच राहतील, अशी माहिती टोपे यांनी दिली. हॉटेलमध्ये मर्यादा घालून दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त गर्दी होऊ नये, असंही टोपे म्हणाले. राज्यात जवळपास 100 ओमायक्रॉनचे रुग्ण आहे. राज्यात पहिला डोस 87 टक्के लोकांनी घेतला असून, दुसरा डोस 57 टक्के लोकांनी घेतला आहे. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल, असंही टोपे म्हणाले. राज्यात दररोज 6 ते 7 लाख लसीकरण होत असून, लसीकरण वाढवण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांनी रात्रभर हॉटेल सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर टोपे यांनी नियम पाळून हॉटेल सुरू ठेवावे असं म्हटलं आहे. लॉकडाउनसाठी आपण 800 मॅट्रिक टन ऑक्सिजन वापराची मर्यादा ठेवली होती. पण ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही मर्यादा आता घटवून 800 वरून 500 वर आणावी लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
भविष्यात तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल
हॉलमध्ये सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी तसेच लग्नात हॉलच्या क्षमतेपेक्षा 25 टक्के म्हणजे 100 लोक असावेत. तर लग्न समारंभात ओपन स्पेसला 250 लोकं इतकी मर्यादा घालून देण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. या दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांनी ऐकत्र येऊ नये. हॉटेलमध्ये केवळ 50 टक्के लोकांनी असावं. त्यापेक्षा गर्दी करु नये. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करू नये, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. यूरोपमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोना नियम पाळले पाहिजेत, असं आवाहन टोपे यांनी केलं. आता सध्या राज्यात कोरोनाचे 1 हजार 400 च्या आसपास रुग्ण आढळून येत असून, भविष्यात तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल ( Third Wave Will Be Of Omicron) , असं भाकीत देखील टोपे यांनी व्यक्त केलं. ओमायक्रॉनमध्ये ऑक्सिजनची जास्त गरज पडणार नाही. ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध लागू केल्याचं देखील टोपे म्हणाले.