जालना - नवीन सरकारने जनतेला मोफत कायदेविषयक मदत करण्यासाठी न्याय व्यवस्थेला देण्यात येणारा निधी वाढवावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. ही अपेक्षा जर पूर्ण होत नसेल तर जनता आणि वकिलांनी त्यासाठी आंदोलन उभारावे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. शहरात आयोजित 'जाणीव अस्मितेची' या कार्यक्रमप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत हेते.
हेही वाचा - नराधमांना आमच्या ताब्यात द्या; जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
निधी वाढवून मिळाल्याने सामान्य जनतेला कायदेविषयक मोफत सहाय्यता मिळेल. त्यामुळे न्याय प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे सरोदे म्हणाले. त्यासोबतच, नवीन सकरकारने नद्यांचे पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीपेक्षा राहण्यायोग्य शहरे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले .