ETV Bharat / state

जालन्यातून 'सैराट' जोडपे ताब्यात, पाचोड पोलिसांची कारवाई - जालना क्राइम न्यूज

" आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना" या म्हणीचा प्रत्यय एका सैराट जोडप्याच्या निमित्ताने आज पाहायला मिळाला. एका अल्पवयीन मुलीला गावातीलच मुलाने पळवून नेले. चार दिवस इथेतिथे फिरल्यानंतर शनिवारी अखेर त्यांना काम मिळाले. त्यांना हळदीच्या कारखान्यात काम मिळाले. पोलिसांनी जेव्हा त्या दोघांना ताब्यात घेतले, तेव्हा हे दोघेही हळदीने पिवळेधमक झालेले दिसले.

couple was taken into custody
जालन्यातून 'सैराट' जोडपे ताब्यात
author img

By

Published : Dec 27, 2020, 7:32 PM IST

जालना - " आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना" या म्हणीचा प्रत्यय एका सैराट जोडप्याच्या निमित्ताने आज पाहायला मिळाला. तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच मुलाने पळवून नेले. चार दिवस इथेतिथे फिरल्यानंतर शनिवारी अखेर त्यांना काम मिळाले. त्यांना हळदीच्या कारखान्यात काम मिळाले. मात्र हे जोडपे ज्या कारखान्यात काम करत होते त्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जेव्हा त्या दोघांना ताब्यात घेतले, तेव्हा हे दोघेही हळदीने पिवळेधमक झालेले दिसले.

शेतातून मुलगी अचानक झाली गायब

पैठण तालुक्यातील गेवराई परिसरातील एका तांड्यावरचे एक कुटुंब मागील पाच वर्षांपासून औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे. या कुटुंबामध्ये पती, पत्नी, दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलीला वडिलांनी आपल्या मुळ गावी आजी आजोबांकडे पाठवले होते. 22 डिसेंबरला शेतात ही मुलगी आजी आजोबांसोबत काम करत होती. मात्र या ठिकाणावरून ही मुलगी अचानक गायब झाली. ही माहिती मुलीच्या वडिलांना औरंगाबाद येथे कळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या लहान भावाला घेऊन गावाकडे धाव घेतली. सगळीकडे शोधाशोध केली असता ती कुठेच दिसली नाही. मात्र नितेश गणपत राठोड वय 20 वर्ष याने या मुलीला पळून नेल्याची, आणि तो सध्या औरंगाबादमधील हनुमान नगर येथे राहत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना कळाली. मिळालेल्या माहितीनुसार मुलिच्या वडिलांनी नितेशचा शोध घेतला, मात्र त्यांना पाहाताच तो पळून गेल्याने, मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जालन्यातून 'सैराट' जोडपे ताब्यात

जालन्यातून जोडप्याला घेतले ताब्यात

तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या मुलीचा शोध सुरू असताना, हे जोडपे काही दिवस बीडमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर जालन्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, तेव्हा हे जोडपे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका मसाल्याच्या कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळावरून पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.