जालना : जिल्ह्यातल्या चांदई एक्को गावामध्ये गावाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गट आपसात भिडले. गावात तणाव निर्माण झाल्याने गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. यावेळी जमावाने पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलीस व्हॅनसह अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गावात शांतता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
अशी घडली घटना : जालन्यातील चांदई एक्को येथे गावच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात राडा झाला. यावेळी गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत बंदोबस्तावरील अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस व्हॅन,अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. त्यामुळे पोलीस व्हॅनसह शासकीय गाड्यांचं नुकसान झालंय. गावात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सध्या गावात शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलीय.
Stone Pelting On Police : गावाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात राडा.. जमावाची पोलिसांवरच दगडफेक, पोलिसांनी केला गोळीबार - पोलिसांवर दगडफेक
जालना जिल्ह्यातील चांदई एक्को गावाच्या ( Chandai Ekka Village Jalna Violence ) प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गट आमने-सामने आले होते. त्यानंतर गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने केलेल्या दगडफेकीत शासकीय वाहनांचं नुकसान ( Stone Pelting On Police ) झालं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले ( Five Injured In Police Firing ) आहेत.