ETV Bharat / state

जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहातच विद्यार्थ्यांचा ठिय्या - शिक्षक

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील शाळेत 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शाळा सुरू होऊन महिना झाला तरी तिथे शिक्षक नसल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा चालू असताना सभेमध्येच ठिय्या मांडला.

जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहातच विद्यार्थ्यांचा ठिय्या
author img

By

Published : Jul 15, 2019, 11:51 PM IST

जालना - जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील विद्यार्थ्यांनी सभागृहासमोर आणि नंतर गृहाच्या हौदामध्येच ठिय्या दिला. त्यामुळे काही काळ सभागृहांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहातच विद्यार्थ्यांचा ठिय्या

भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील शाळेत 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शाळा सुरू होऊन महिना झाला तरी तिथे शिक्षक नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना आज जालन्याला सर्वसाधारण सभेमध्ये आणून उभे केले. शिक्षण विभागाने सहा तारखेलाच एका शिक्षकाची नियुक्ती केली होती. मात्र तो शिक्षक अद्याप पर्यंत हजर झाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. वारंवार जिल्हा परिषदेकडे मागणी करूनही ही शिक्षक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि गावच्या सरपंचांनी सभागृहांमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षांबद्दल अशोभनीय भाषा वापरल्याने या पालकांना आणि सरपंचांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

दरम्यान जिल्ह्यामध्ये सहाशे शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही अडचण येत असून, ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत. अशा शिक्षकांची आवश्यक ठिकाणी त्वरित प्रतिनियुक्ती करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी दिली.

Intro:जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते .विषय पत्रिकेवरील कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील विद्यार्थ्यांनी प्रारंभी सभागृहासमोर आणि नंतर सभागृहाच्या हौदांमध्ये ठिय्या दिले. त्यामुळे काही काळ सभागृहांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . यावेळी सभागृहामध्ये सदस्य आपल्या अडचणी सभागृहासमोर मांडत होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे,यांच्यासह जि प सदस्य राहुल लोणीकर ,अवधूत खडके, शालिग्राम मस्के, जयमंगल जाधव ,डॉक्टर साबळे, सौ. आशा पांडे. आदि सदस्यांचीही उपस्थिती होती.

Body:भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथे 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहे परंतु तिथे शिक्षक नसल्यामुळे पालकांनी या विद्यार्थ्यांना आज जालन्याला सर्वसाधारण सभेमध्ये आणून उभे केले. दरम्यान यासंदर्भात शिक्षण विभागाने सहा तारखेलाच एका शिक्षकाची नियुक्ती केली होती .मात्र तो शिक्षक अद्याप पर्यंत हजर झाला नाही .त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. आणि पर्यायाने वारंवार जिल्हा परिषदेकडे मागणी करूनही ही शिक्षक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि सरपंचाने सभागृहांमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला ,जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष बद्दल अशोभनीय भाषा वापरली, त्यामुळे सदस्यांसह अध्यक्ष देखील संतप्त झाले आणि आणि या पालकांना आणि सरपंचांना सभागृहाच्या बाहेर काढण्याचे फर्मान सोडले.
दरम्यान जिल्ह्यामध्ये सहाशे शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे ही अडचण येत असून ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत अशा शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती त्वरित करण्यात येतील अशी माहिती अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.