जालना SRPF Jawan Suicide : जालना येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास राज्य राखीव पोलीस दलाच्या शस्त्रागारात एका जवानानं आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण आद्याप समजू शकलं नाही. सचिन गोविंदराव भदरगे (वय 38) असं या आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव आहे.
जवानाच्या डोक्यात 5 गोळ्या : मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा आंबेकर यांनी मृदेहाची तपासणी केली. तेव्हा जवानाच्या डोक्यात 5 गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. इन कॅमेरा शवविच्छेदन होण्याची शक्यता असल्यानं या जवानाचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवला जाण्याची शक्यता आहे. आत्महत्येचं कारण अद्याप तपासात समोर येईल. जवानाने एवढे टोकाचे पाऊल का उचललं याबद्दल तर्क वितर्क केले जात आहेत.
आत्महत्येमागील कारण अस्पष्ट : जालना राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक तीनमध्ये सचिन गोविंद भदरगे तैनात होते. यांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शस्त्रागारात आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत. सचिन हा राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 3 च्या शस्त्रागारात कार्यरत होता. सचिन गोविंद भदरगे याच्यासह आणखी एक सहकारी आज सकाळी शस्त्रागारात कर्तव्यासाठी हजर होता.
पोलीस घटनास्थळी दाखल : सचिन भदर्गे यांना कौटुंबिक तणावाची प्राथमिक माहिती आहे. आई-वडिलांपासून विभक्त झाल्यामुळं त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. तर दुसरी पत्नीही त्याच्यावर आई-वडिलांपासून दूर जाण्यासाठी दबाव टाकत होती, अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरू होती. या सततच्या तणामुळं त्यांनी शनिवारी टोकाचं पाऊल उचलल आणि आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ एसआरपीएफ अधिकारी, पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवला.
हेही वाचा -
- Youth beaten in Mumbai : 'जय श्री राम' बोलला नाही म्हणून... तरुणाला मुंबईत परप्रांतियांकडून मारहाण, पाहा व्हिडिओ
- Gautami Patil Controversy : गौतमी पाटील उशिरा आल्यानं हुल्लडबाजांनी तोडल्या खुर्च्या; पोलिसांचा लाठीचार्ज, पहा व्हिडिओ
- Maratha Reservation Row : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आजपासून मराठा आरक्षण संवाद दौऱ्यास सुरुवात