ETV Bharat / state

SP Tushar Doshi on compulsory leave: लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई, आंदोलक मनोज जरांगे यांनी 'ही' केली मागणी - जालना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज

SP Tushar Doshi On Compulsory Leave: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. सर्वत्र या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जातोय. या प्रकरणी जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

SP Tushar Doshi on compulsory leave
पोलीस अधीक्षक तुषार दोषी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 3:41 PM IST

Updated : Sep 3, 2023, 6:16 PM IST

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरण

जालना SP Tushar Doshi on compulsory leave: जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. या लाठीचार्जमध्ये 350 हून अधिक आंदोलक आणि सुमारे 35 पोलीस अधिकारी जखमी झाले होते. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. अगोदर आंदोलन शांततेत सुरळितपणे सुरू होतं. पण त्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. त्यामुळं लाठीचार्ज करावा लागला, असं पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितलं.

मनोज जरांगे यांचे सरकारला आवाहन : पोलीस अधिक्षकांवर केलेल्या कारवाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. आमच्या आंदोलनामुळे सरकारनं निर्णय घ्यायला सुरुवाय केलीय. परंतु या निर्णयामुळे आम्ही समाधानी नाही. आम्हाला मारहाण करणारे सगळेच पोलीस बडतर्फ पाहिजे, अशी मागणी त्यांनी दिलीय. विरेंद्र पवार यांच्या आरोपावर जरांगे म्हणाले की, आमच्या पट्ट्यात आमच्या आंदोलकांनी दगडफेक केलेली नाहीय. विरेंद्र पवार यांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण तेच देतील. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला आवाहन केलंय. ते म्हणाले की, एका ओळीचा आरक्षणाचा जीआर काढा आणि विषय संपवा. (Lathicharge on Maratha Protesters)

महाराष्ट्रभर मराठा बांधवांचा उद्रेक : पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर (Lathicharge on Maratha Protesters in Jalna) महाराष्ट्रभर मराठा बांधवांनी उद्रेक केलाय. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्यामुळं जाळपोळ आणि मराठा आंदोलकांचा उद्रेक सुरुच आहे. मात्र, आज पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. शनिवारी शरद पवार यांनी लाठीचार्जदरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही आज या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. राज ठाकरे यांनी फोनवरून मराठा आंदोलकांशी संवाद साधून उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला. अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड केलीय. शरद पवारांनी या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केलीय. गृहमंत्रालयानं शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी निवड केली आहे. त्यांनी आजच पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचा :

  1. Jalna Maratha Protest : राज ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, हा अमानूष अत्याचार - मनसे
  2. Uddhav Thackeray on Jalna Lathicharge : जालना लाठीचार्ज प्रकरणी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'एक फुल अन् दोन हाफ...'
  3. Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे

Last Updated : Sep 3, 2023, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.