ETV Bharat / state

आरोग्य मंत्र्यांच्या शहरातील महिला रुग्णालयातच नाही सोनोग्राफी मशीन, गरोदर महिला त्रस्त - जालना स्त्री रुग्णालय

सोनोग्राफीसाठी जवळपास ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवले जाते. या प्रवासामुळे रुग्णाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

hospital
जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नाही, गरोदर महिला त्रस्त
author img

By

Published : Feb 15, 2020, 10:40 PM IST

Updated : Feb 15, 2020, 11:38 PM IST

जालना - शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलांची उपचारांसाठी प्रचंड गर्दी असते. विशेष करून गरोदर मातांची तपासणी आणि बाळंतपण येथे केली जातात. असे असुनही या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सोनोग्राफी मशीन या रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांच्या गर्भ वाढीची आणि अन्य आजारांची तपासणी होणार कशी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या शहरातील महिला रुग्णालयातच नाही सोनोग्राफी मशीन, गरोदर महिला त्रस्त

सोनोग्राफीसाठी जवळपास ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवले जाते. या प्रवासामुळे रुग्णाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री घडली. परतूर येथील एका अल्पवयीन मुलीला मुलाने पळवून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून या दोघांनाही गुरुवारी निजामाबादमधून ताब्यात घेतले. या पीडित मुलीला आरोग्य तपासणी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार वाजता परतूर पोलिसांनी जालना येथील स्त्री रुग्णालयात आणले. मात्र, येथे सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे सुरुवातीला येथील डॉक्टरांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर रात्री ८ वाजता सोनोग्राफी मशीन नसल्याचे सांगून रुग्णालय प्रशासन मोकळे झाले. पीडितेच्या तपासणीनंतर तिला पुढिल आदेशासाठी न्यायालयात हजर करणे गरजेचे होते. दरम्यानच्या काळात पोलीस प्रशासन हतबल झाले होते.

हेही वाचा - एफएफटीच्या बैठकीनंतर दहशतवादी हाफिज सईदची तरुंगातून होईल सुटका, सूत्र

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वतः जालना शहरात राहतात. असे असतानाही या निर्ढावलेल्या आरोग्य प्रशासनामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. जिल्हास्तरीय रुग्णालयासमोरील अतिक्रमणे १५ दिवसांपूर्वी हटवली होती. मात्र, बंद असलेले एक गेट हे केवळ सुरक्षिततेच्या कारणामुळे आणि देवाणघेवाण मुळे बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर आज हे गेट उघडण्यात आले. दरम्यान, रात्रीच्या वेळी तरुण-तरुणी या रुग्णालयात टिकटॉकचे व्हिडिओ बनवत असल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे एकुणच या रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Last Updated : Feb 15, 2020, 11:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.