जालना - सारेगामा या संगीत मालिकेतील सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिने पुण्याहून जालन्यात येऊन कोरोनाची तिची लस घेतली. तिच्यासोबत तिचे पती, आई, वडील आणि भाऊ देखील होता. पंधरा वर्षांपूर्वी गवळणीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कार्तिकीने पुण्याहून ऑनलाइन नोंदणी करून जालनाचे ठिकाण नोंद केले होते.
कार्तिकी मुळ जालन्याची -
पंधरा वर्षांपूर्वी सारेगामा ही एक सुमधुर गाण्यांची मालिका सुरू होती. दिग्गज बाल कलाकार या मालिकेत होते. त्या मधीलच ही एक कार्तिकी गायकवाड. घागर घेऊन -घागर घेऊन या गौळणीमुळे ती सर्वत्र परिचित झाली. मुळ जालना जिल्ह्यातील असल्यामुळे तिने जालन्यात येऊन कोरोनाची लस घेतली. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या मोफत लसीकरण केंद्रात तिने दि. 11 रोजी ही लस घेतली. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा - राज्य शासन म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करणार