ETV Bharat / state

Jalana Housing Society Scam : धक्कादायक! जालन्यात गृहनिर्माण संस्थेच्या नावावर 400 कोटींचा घोटाळा

शासकीय सहकारी कर्मचऱ्यांचे घराचे (400 crore scam In Jalana Housing Society) स्वप्न साखर व्हावे म्हणून सहकार पण वस्त्र विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत गट विमा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.( Housing Minister Jitendra Awhad ) मात्र, गृहनिर्माण संस्थांच्या नावाखाली याचे योजनेत बिल्डर लॉबी आणि सहकार पणन वस्त्र विभानी संगनमत करून महाघोटाळा केल्याचा आरोप या योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला आहे.

जालन्यात गृहनिर्माण संस्थेच्या नावावर 400 कोटींचा घोटाळा

author img

By

Published : Feb 3, 2022, 10:22 AM IST

Updated : Feb 3, 2022, 12:32 PM IST

जालना - राज्यातील शासकीय सहकारी कर्मचऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून सहकार, पणन, वस्त्र विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत गट विमा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ( Jalana Housing Society )मात्र, गृहनिर्माण संस्थांच्या नावाखाली या योजनेत बिल्डर लॉबी आणि सहकार, पणन, वस्त्र विभागाने संगनमत करून महाघोटाळा केल्याचा आरोप या योजनत फसवले गेलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हा राज्यातील सर्वात मोठा घरकुल घोटाळा असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत.

प्रतिक्रिया

सदनिकांचे काम अर्धवट सोडून या बिल्डर लॉबीने केला पोबारा

राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्र विभाग मंत्रालय मुबईच्या वतीने परिपत्रक काढून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे उपलब्ध व्हावी म्हणून गट विमा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. जालन्यात ही नाशिक आणि औरंगाबादच्या बिल्डर लॉबीने 27 गृहनिर्माण संस्था स्थापन करून जिल्ह्यातील एक हजार कर्मचाऱ्यांच्या नावे हे कर्ज उचलून त्या कर्जाचा बोजा कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर आधिकाऱ्यांशी संगनमत करून दाखवला गेला. दरम्यान, सदनिकांचे काम अर्धवट सोडून या बिल्डर लॉबीने पोबारा केला आहे.

कुणी घर देत का?

डोक्यावर कर्ज आणि त्याचे व्याज फेडून ही घर मागायचे कुणाला अशा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या समोर उभा टाकला आहे. दोन वर्षात घर बांधून देतो म्हणून या बिल्डर लॉबीने कर्मचाऱ्यांच्या नावावर दोन तीन हप्ते उचलून कोणत्याही प्रकारचे पजेशन न देता पोबारा केल्याने बाबाही गेल्या अन् दशम्याही गेल्या अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांतच सहकार पणन व वस्त्र विभाग मंत्रालय मुबईच्या वतीने चार लाख रुपय कर्ज आणि त्यांवर आठ लाखाचे व्याज अशी वसुलीच्या नोटीस कर्मचाऱ्यांना बजावल्याने पैसे भरूनही कुणी घर देत का, घर. अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

कर्जाची परत फेड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन आणि सेवा ही शासनाकडून अडवणूक करण्यात आल्याने 40 वर्ष सेवा करून हक्काचे पैसे देऊनही घर आणि निवृत्ती वेतन ही मिळत नसल्याने आणि या गृहनिर्माण संस्थाकडून फसवणूक झाल्याने आता दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. दरम्यान, बिल्डर आणि सहकार पणन व वस्त्र विभाग मंत्रालय मुबई यांनी संगनमत करून केलेल्या या घोटाळ्याची सखोल चौकशी करून कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डर विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

हेही वाचा - एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे अन् महाराष्ट्राच्या हक्काचे काढून घ्यायचे! सामनातून हल्ला

Last Updated : Feb 3, 2022, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.