ETV Bharat / state

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भोकरदनमध्ये विविध उपक्रम - jalna district news

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त भोकरदन येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.

रुग्णांना फळे वाटप करताना शिवसैनिक
रुग्णांना फळे वाटप करताना शिवसैनिक
author img

By

Published : Nov 17, 2020, 8:24 PM IST

भोकरदन (जालना) - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 8 वा स्मृतीदिन भोकरदन येथे विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्मृतिदिनानिमत्त शहरात विविध सामाजिक उपक्रम

शहरातील गोरगरीब निराधार व मजुरांना मोफत जेवण देण्यात आले. वयोवृद्ध तसेच निराधार गरजू महिलांना साडी, नववारी लुगडे व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करून श्री गुरू गणेश मिश्री गोशाळा येथे गायींना चारा वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील तळेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.