ETV Bharat / state

महाविकासआघाडी सत्तेत.. बदनापुरात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

author img

By

Published : Nov 27, 2019, 7:30 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. बदनापूर येथे तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केला. सर्वांच्या संमतीने उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यंमत्रीपदासाठी जाहिर करण्यात आले आहे.

jalna
बदनापुरात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

जालना - मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल बदनापूर येथे तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

बदनापुरात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वांच्या संमतीने उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यंमत्रीपदासाठी जाहिर करण्यात आले आहे. उद्या उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

हेही वाचा - उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री; यवतमाळामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी "राज्यघटनेचे उल्लंघन करून भाजपने लोकशाहीची हत्या केली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार राज्याला नवी दिशा देईल" असा विश्वास व्यक्त केला. तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, बाळासाहेब वाकुळणीकर, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आदींसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Intro:बदनापूर, दि. 27 (प्रतिनिधी): मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शपथविधी होणार असल्यामुळे तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड जल्लोष साजरा करून फटाक्याच्या आतषबाजीत प्रचंड घोषणाबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी राजीनामे दिल्याने महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग मोकळा होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यंमत्री होणार असल्यामुळे शिवसैनिक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात. 'आवाज कुणाचा, शिवसेनेचा', 'आला रे आला शिवसेनेचा वाघ आला', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. फटाक्याच्या प्रचंड आतषबाजीत हातात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांचा उत्साह यावेळी दिसून येत होता. 'राज्यघटनेचे उल्लंघन करत लोकशाहीची भाजपने हत्या केली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला. कोणताही आधार नसताना सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस व भाजप तोंडघशी पडले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार राज्याला नवी दिशा देईल,' असा विश्वास यावेळी माजी आ. संतोष सांबरे यांनी व्यक्त्‍ केला. त्याचप्रमाणे यावेळी 'एकच साहेब पवारसाहेब', 'राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो' अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जल्लोषात सहभाग नोंदवण्यात आल्याने एक वेगळेच वातावरण पहायला मिळत होते. यावेळी माजी आ. संतोष सांबरे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, बाळासाहेब वाकुळणीकर, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, गणेश डोळस, बबलू चौधरी, कैलास मदन, अंबडगावचे सरपंच राजेश जऱ्हाड, पांडूरंग जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, राजेंद्र जैस्वाल, शहरप्रमुख राजेंद्र जऱ्हाड, शिकूर बेग मिर्झा, कैलास खैरे, सुनील बनकर, आबासाहेब पवार, अरुण पैठणे, संजय बळप, अमोल दाभाडे, उध्दव खैरे, संदीप पवार आदींसह मोठया संख्येने शिवसैनिक, रार्ष्टवादी काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.. Body:जल्लोष करताना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्तेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.