ETV Bharat / state

जालन्यातील शास्त्री कस्तुरेंच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी - jalna

श्री चतुर्वेदेश्वर विश्रामधाम सावरगाव (तालुका परतुर) याठीकाणी असलेल्या यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

गुरुपौर्णिमा उत्साहात
author img

By

Published : Jul 17, 2019, 10:30 AM IST

जालना- येथील श्री चतुर्वेदेश्वर विश्रामधाम सावरगाव (तालुका परतुर) याठिकाणी असलेल्या यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 23 एप्रिल 1969 रोजी संस्कृत विषयाचे अभ्यासक यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी गोदावरीच्या काठावर या आश्रमाची स्थापना केली होती. निसर्गाच्या सानिध्यात गोदातटावर असलेल्या या आश्रमात गेल्या पन्नास वर्षात वेदशास्त्रसंपन्न ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आणि सध्य परिस्थिती इथे वेदशास्त्रांचे घडे गिरवत असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाच्या वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली.

गुरुपौर्णिमा उत्साहात

नित्यनियमाप्रमाणे काकड आरती झाल्यानंतर महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे त्यांच्या पादुकांना अभिषेक, त्यानंतर व्यासपूजन, प्रवचन, असे दिवसभरासाठी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बाहेरगावी गेलेला विद्यार्थ्यांसोबतच पंचक्रोशीतील शिष्य मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुकुल पद्धतीने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद या चारही वेदांचे इथे विद्यार्थी घडविले जातात. परिसरातच वेदशास्त्रसंपन्न अध्यापकांची निवासस्थाने आहेत. शास्त्री कस्तुरे, लक्ष्मीकांत वझुरकर गुरुजी, रोहित गुरुजी, हे अध्यापक येथील विद्यार्थ्यांना वेदाचे धडे देत आहेत. या विद्यार्थ्यांना वेद अध्यायाना सोबतच शालेय शिक्षणाचे धडेही ही इथे मिळतात. त्याच सोबत मातोश्री रमाई गोशाळा देखील येथे आहे.

Intro:श्री चतुर्वेदेश्वर विश्रामधाम सावरगाव (तालुका परतुर )इथे असलेल्या महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 23 एप्रिल 1969 रोजी संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी गोदावरीच्या काठावर या आश्रमाची स्थापना केली. गुरुकुल पद्धतीने ऋग्वेद ,यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद या चारही वेदांचे इथे हे विद्यार्थी घडविले जातात .परिसरातच वेदशास्त्रसंपन्न अध्यापकांची निवासस्थाने आहेत .त्याच सोबत मातोश्री रमाई गोशाळा देखील येथे आहे. निसर्गाच्या सानिध्यात गोदातटावर असलेल्या या आश्रमात गेल्या पन्नास वर्षात वेदशास्त्रसंपन्न ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आणि आणि सध्य परिस्थिती इथे वेदशास्त्रांचे घडे गिरवत असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाच्या वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली.

Body:नित्यनियमाप्रमाणे काकड आरती झाल्यानंतर महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे त्यांच्या पादुकांना अभिषेक, त्यानंतर व्यासपूजन ,प्रवचन, असे दिवसभरासाठी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बाहेरगावी गेलेला विद्यार्थ्यांसोबतच पंचक्रोशीतील शिष्य मंडळी इथे हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदशास्त्रसंपन्न देशी शास्त्री कस्तुरे, वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मीकांत वझुरकर गुरुजी, वेदशास्त्रसंपन्न रोहित गुरुजी,हे अध्यापक येथील विद्यार्थ्यांना वेदाचे धडे देत आहेत. या विद्यार्थ्यांना वेद अध्यायाना सोबतच शालेय शिक्षणाचे धडेही ही इथे मिळतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.