जालना - जिल्ह्यातील रेवगाव हे शेतकरी संघटनेचे मोठे केंद्रस्थान आहे. शेतकरी शरद जोशी यांनी स्वतः येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी आज शरद जोशी यांचा पाचवा स्मृतिदिन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन साजरा केला. कर्मवीर भाऊराव पाटील सार्वजनिक वाचनालयात शरद जोशी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
शेतकऱ्यांनी गर्दीमूळे चुकीच्या मार्गाने जाऊ नये
केंद्राने शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे राजकीय दबावापुढे किंवा शेतकऱ्यांच्या दबावापुढे मागे घेऊ नयेत. कारण सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन हे चूक किंवा बरोबर आहे, हे पाहण्यापेक्षा जिथे गर्दी दिसेल त्यांच्यामागे जाण्याचा प्रयत्न होत आहे. असाच प्रकार शेतकऱ्यांच्या इतर संघटनांचाही झाला आहे. राजकीय फायद्यासाठी अन्य शेतकरी संघटना या चुकीच्या रस्त्यावर जात आहेत. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते डॉ. अप्पासाहेब कदम यांनी व्यक्त केले.
अर्थशास्त्र मांडणारा नेता
शेतीमध्येही अर्थशास्त्र असते हे सर्वांना ठणकावून सांगणारा नेता, शेतकऱ्यांसाठी चांगली नोकरी सोडून काम करणारा नेता, स्वतःची मालमत्ता शेतकऱ्यांसाठी वाटणारा नेता म्हणजे शरद जोशी हे आहेत. त्यांनी शेतकर्यांसाठी नवीन विचार मांडले त्यात विचारांच्या धर्तीवर आज शेतकरी टिकून आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांसाठी महामानव जर कोणी असेल तर ते म्हणजे स्वर्गीय शरद जोशी आहेत, असे मत प्रा. नारायण बोराडे यांनी व्यक्त केले.
रेवगाव येथे झालेल्या या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला बाबुराव गोल्डे, अप्पासाहेब कदम प्रा. नारायण बोराडे, संतोष राव मोहिते, रमेश खांडेभराड, विश्वंभर भानुसे, लक्ष्मण कावळे, रघुनाथ गोल्डे, श्रीधर गोल्ड, संतोष महाजन, आनंदा कदम, सुदर्शन, जनार्दन गोल्डे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - वेडाच्या झटक्यामध्ये बरळणाऱ्या दानवेंचे तोंड काळे करणार; खोतकरांचा इशारा
हेही वाचा - पत्रकारांचा ससेमिरा टाळत खासदार दानवे भोकरदनकडे रवाना