ETV Bharat / state

चारा छावण्यांचा प्रश्न बिकट, अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संघटना निवडणुकीत मग्न - animals

जालना जिल्ह्यात चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात फक्त २ छावण्या सुरु झाल्या आहेत.

चारा छावण्यांचा प्रश्न बिकट, अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संघटना निवडणुकीत मग्न
author img

By

Published : Apr 17, 2019, 8:35 PM IST

जालना - जिल्ह्यात चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात फक्त २ छावण्या सुरु झाल्या आहेत. त्याही १६ एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात १७ प्रस्ताव आले होते. त्यापैकी फक्त २ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित १५ प्रस्ताव हे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, ते अद्यापपर्यंत पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी आलेले नाहीत.

जिल्हात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, भायगव्हाण आणि त्याच कारखान्याच्या मौजे अंकुश नगर तालुका अंबड येथे अशा एकूण २ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, उर्वरित १५ चारा छावण्या अधिकार्‍यांच्या आणि संबंधित प्रस्तावित संस्थेच्या दिरंगाईमुळे सुरू झाल्या नाहीत. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुचित केले आहे. मात्र, दीड महिना झाला तरीदेखील या कागदांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. यामध्ये विशेष करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देण्याची इच्छा असूनही खालच्या थरातील अधिकारी आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना देखील कोणत्याही हालचाली न करता निवडणुकीमध्ये मग्न असल्यामुळे चारा छावण्या उभारणीस विलंब होत आहे. पर्यायाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे.

Intro:जालना जिल्ह्यात चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला असून आत्तापर्यंत फक्त दोन आणि त्या देखील काल दिनांक 16 रोजी सुरू झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यामध्ये सतरा प्रस्ताव आले होते. त्यापैकी फक्त दोनच छावण्यांना मंजुरी मिळाली. उर्वरित 15 प्रस्ताव हे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले मात्र ते अद्याप पर्यंत पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला आहे

Body:जालना जिल्ह्यामध्ये सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असतानाही फक्त भोकरदन अंबड घनसावंगी आणि जालना तालुक्यातून एक असे एकूण सतरा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते. कौंसा मध्ये चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्तावित ठिकाण त्यामध्ये श्री गणराज सार्वजनिक वाचनालय भोरखेडा (मौजे धावडा), स्वर्गीय पाटीलबा गंगाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भोरखेडा(मौजे भेरखेडा) तालुका भोकरदन, आजुबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दानापूर तालुका भोकरदन (पळस खेडा मुरतड), कै.ठगणाबाई महिला मंडळ वाढोना तालुका भोकरदन(वाढोना), सरस्वती मजूर सहकारी संस्था मर्यादित जालना(पिरपिंपळगाव) श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जळगाव सपकाळ तालुका भोकरदन(जळगाव सपकाळ), श्री निळकंठेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जामखेड तालुका अंबड ( जामखेड),राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ अंबड(अंबड), ज्ञानसागर शिक्षण संस्था नांदी तालुका अंबड(नांदी), शंकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करजगाव तालुका भोकरदन (करजगव),कुंडलिका व्हॅली ऍग्री व्हेचर प्रोडूसर कंपनी निधोना तालुका जालना (भरडी,ता.अंबड)कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी(भयगव्हान) इको वपस बायोमास प्रोसेसर्स अंड सप्लायर्स निधोना तालुका जालना(रेवळगाव ता.घनसावंगी) गणेश मजूर सहकारी संस्था पारनेर तालुका अंबड (पारनेर)कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुश नगर तालुका अंबड(अंकुशनगर) आणि किसान विकास दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था पांगरा तालुका घनसावंगी(पांगारा) असे सतरा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते .त्यापैकी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना यांच्या मौजे भायगव्हाण तालुका घनसावंगी आणि आणि त्याच कारखान्याच्या मौजे अंकुश नगर तालुका अंबड येथे अशा एकूण दोन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 12 रोजी मंजुरी दिली आहे. मात्र उर्वरित पंधरा चारा छावण्या अधिकार्‍यांच्या आणि संबंधित प्रस्तावित संस्थेच्या दिरंगाईमुळे सुरू झाल्या नाहीत. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुचित केले आहे. मात्र दीड महिना झाला तरी देखील या कागदांची पूर्तता अद्याप पर्यंत झालेली नाही. यामध्ये विशेष करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे .कारण त्यांना दिनांक 7 मार्च रोजी पत्र पाठवून धावडा, मौजे बोरखेडा, मौजे पळसखेडा ,मौजे वाढोना, मौजे पिंपळगाव तालुका जालना ,मौजे जळगाव सपकाळ ,मौजे जामखेड तालुका अंबड ,या ठिकाणच्या कागदपत्र बद्दल दिनांक 7 मार्च रोजी पत्र दिले होते. मात्र अद्याप पर्यंत या पत्र संदर्भात कोणताही दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची ची परवानगी देण्याची इच्छा असूनही खालच्या थरातील अधिकारी आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना देखील कोणत्याही हालचाली न करता निवडणुकीमध्ये मग्न नसल्यामुळे चारा छावण्या उभारणीस विलंब होत आहे. पर्यायाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे.

*छावण्या चालकांना काय मिळते*
जनावरांसाठी छावण्या सुरू करणाऱ्या संस्थांना मोठ्या जनावरांसाठी दर दिवशी 90 रुपये तर लहान जनावरांसाठी दर दिवशी 45 रुपये हे दिल्या जातात. छावण्यांमध्ये जनावर किती दिवस ठेवायचे याचे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या चारा छावण्यांमध्ये पाऊस पडेपर्यंत जरी जनावर ठेवले तरीदेखील चारा छावणी चालकांना याचा मोबदला दिला जातो .वरील सतरा ठिकाणव्यतिरिक्त इतरही कुठे चारा छावणी सुरु करावयाची असल्यास संबंधितांचे प्रस्ताव तहसीलदारांकडे दिल्यानंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी संयुक्त दौरा करून त्या परिसरातील ावणीची आवश्‍यकतेचा प्राधान्यक्रम ठरवून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवितात आणि त्यानंतर विविध संस्थांकडून प्रस्ताव मागवून चारा छावण्यांना मंजुरी दिली जाते. जालना जिल्ह्यातील बदनापूर मंठा परतुर जाफराबाद या चारही तालुक्यातून एकाही चारा छावणीसाठी प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे या तालुक्यात भविष्यात चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत तर जनावरांचा प्रश्न बिकट होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.