ETV Bharat / state

टॅलेंट सर्च करून विद्यार्थ्यांना दिले 'हैदराबाद' सहलीचे बक्षीस - जालना जिल्हा परिषद लेटेस्ट बातमी

अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभाग केवळ दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील शाळा निवडून तेथील विद्यार्थ्यांना सहलीला पाठवितात. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. तो होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची एक विशेष परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून सुरूवातीला शाळा स्तर, केंद्र स्तर ,तालुका पातळी, अशा विविध पातळ्यांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. या विद्यार्थ्यांमधील टॅलेंट सर्च करून त्यांना हैदराबादला पाठवून एक प्रकारचे बक्षीस दिले आहे.

jalna zp
जालना जिल्हा परिषद
author img

By

Published : Feb 11, 2020, 3:11 PM IST

Updated : Feb 11, 2020, 7:20 PM IST

जालना - राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने स्वखर्चाने हैदराबाद येथे तीन दिवस सहलीवर पाठवले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी हा उपक्रम राबविला आहे. या सहलीतून हुशार विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल आणि तेथून आल्यानंतर पुन्हा परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना पुढे सरकण्याची संधी मिळेल, असा या सहलीचा उद्देश्य आहे.

टॅलेंट सर्च करून विद्यार्थ्यांना दिले 'हैदराबाद' सहलीचे बक्षीस

हा उपक्रम सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवायचा आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभाग केवळ दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील शाळा निवडून तेथील विद्यार्थ्यांना सहलीला पाठवितात. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. तो होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची एक विशेष परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून सुरूवातीला शाळा स्तर, केंद्र स्तर ,तालुका पातळी, अशा विविध पातळ्यांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. या विद्यार्थ्यांमधील टॅलेंट सर्च करून त्यांना हैदराबादला पाठवून एक प्रकारचे बक्षीस दिले आहे. रात्री दहा वाजता जालना स्थानकातून हे विद्यार्थी हैदराबाद कडे रवाना झाले.

हेही वाचा - थाटात पार पडला काम्या पंजाबीचा विवाहसोहळा, पाहा व्हिडिओ

रेल्वेच्या प्रवासासाठी या विद्यार्थ्यांसाठी खास दोन डबे आरक्षित करण्यात आले आहेत. सहलीला निघताना हे विद्यार्थी उत्साहित आणि आनंदित होते. तर या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठीही 9 शिक्षक आणि 9 शिक्षिका सोबत आहेत.

Intro:राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत जालना जिल्हा परिषदेच्या सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने स्वखर्चाने हैदराबाद येथे तीन दिवस सहलीवर पाठवले आहे .आणि या सहलीतून हुशार विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल आणि तेथून आल्यानंतर पुन्हा परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना पुढे सरकण्याची संधी मिळेल या उद्देशाने जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी हा उपक्रम राबविला आहे.

Body:खरेतर हा उपक्रम सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवायचा आहे .मात्र अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग केवळ दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील शाळा निवडून हा उपक्रम राबवून एखादा शाळेची निवड करून त्या विद्यार्थ्यांना पाठवितात .मात्र यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. तो होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची एक विशेष परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून सुरूवातीला शाळा स्तर, केंद्र स्तर ,तालुका पातळी, अशा विविध पातळ्यांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली ,आणि या विद्यार्थ्यांमधील टॅलेंट सर्च करून त्यांना हैदराबादला पाठवून एक प्रकारचे बक्षीस दिले आहे .रात्री दहा वाजता जालना स्थानकातून हे विद्यार्थी हैदराबाद कडे रवाना झाले. रेल्वेच्या प्रवासासाठी या विद्यार्थ्यांसाठी खास दोन डबे आरक्षित करण्यात आले आहेत. आणि या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठीही 9 शिक्षक आणि नऊ शिक्षिका सोबत आहेत. अत्यंत आनंदाच्या वातावरणात हे विद्यार्थी काल रवाना झाले.

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.