ETV Bharat / state

जालन्यात गाडीतून धारदार शस्त्र जप्त, दोन संशयित ताब्यात - Seized a stick with a sharp weapon

घातपात करण्याच्या उद्देशाने अंधारामध्ये उभ्या केलेल्या गाडीतून पोलिसांनी एक धारदार शस्त्र आणि लाकडी काठी जप्त केली आहे. अंधाराचा फायदा घेऊन या गाडीतील दोघे पसार झाले. पोलिसांनी याप्रकरणी आज दोन संशयितांना अटक केली आहे.

jalana news
जालना पोलीस
author img

By

Published : Oct 17, 2020, 6:39 PM IST

जालना - देऊळगाव राजा रस्त्यावर एका गाडीतून पोलिसांनी एक धारदार शस्त्र जप्त केले आहे. अंधाराचा फायदा घेऊन या गाडीतील दोघे पसार झाले. मात्र पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला. पोलिसांनी याप्रकरणी आज दोन संशयितांना अटक केली आहे. कृष्णा वाघ आणि गणेश चोपडे अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे या तालुका हद्दीत गस्त घालत असताना, देऊळगाव राजा रस्त्यावरील पानशेंद्र भागात समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ त्यांना एक गाडी दिसली. या गाडीत बसलेल्या दोघांकडे त्यांनी कागदपत्रांची चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीतून उतरण्यास देखील नकार दिला. मात्र पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये स्टीलची धारदार गुप्ती आणि लाकडी काठी आढळली. मात्र तोपर्यंत आरोपींनी अंधाराचा फायद घेत पोबारा केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.