ETV Bharat / state

निसर्गाने दिलेल्या गोष्टींची जपणूक न केल्यास जीवनाचा धिंगाणा होईल - ctmk school

हवा, पाणी आणि वृक्ष यांची जपणूक व संवर्धन न केल्यास मानुष्याच्या जीवनाचा धिंगाणा होईल, असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिला.

पर्यावरण संवर्धनावर कविता गाताना वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक
author img

By

Published : Jul 7, 2019, 9:56 AM IST

जालना- निरसर्गाने मानवाला दिलेल्या हवा, पाणी आणि वृक्ष यांची जपणूक व संवर्धन न केल्यास मनुष्याच्या जीवनाचा धिंगाणा होईल, असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात ५ लाख वृक्ष लागवडीच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

पर्यावरण संवर्धनावर कविता गाताना वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक

शासनाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रामध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवितेच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. महाडीक यांनी सोप्या सरळ आणि सुटसुटीत भाषेत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवाडीचा संदेश दिल्याने विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर पावसाच्या रिमझिम सरींमध्ये विद्यार्थ्यांनी परिसरात वृक्ष लागवड केली. त्यानंतर कन्हैया नगर परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्राच्या जागेपासून शहरातील सी. टी .एम .के शाळेपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करून एक वेगळेच वातावरण निर्माण केले.

Intro:हवा, पाणी, माती, आहे आपले सोबती,
सांभाळून वापरा या तिघांना,
नाही तर जीवनाचा धिंगाणा ...

वृक्षतोड आहे फार झोक्यात
झाला बदल हवामानात,
झाडे लावू जोरात ,शुद्ध ठेव हवेला ,
सांभाळून वापरा या तिघांना ,
नाहीतर जीवनाचा.......
रसायन नका टाकू मातीत,
कस कमी होईल एका रातीत,
सेंद्रिय खत जरा वापरू या मातीला ,
सांभाळून वापरा या तिघांना ,
नाहीतर ....
कारखान्याचे हे पाणी नाल्यात ,
हळूहळू जाते बाई नदीत,
दूषित होतं पाणी बाई बाई,
रंग येतो पाण्याला ,
सांभाळून वापरा या तिघांना,
नाहीतर .......
हवा ,पाणी आणि वृक्ष या तिघांची जपणूक नाही केली ,यांचे संवर्धन नाही केले तर जीवनाचा कसा धिंगाणा होईल हे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. सोप्या सरळ आणि सुटसुटीत भाषेत हा संदेश विद्यार्थ्यांना कळाल्यामुळे तेवढ्याच उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या या संदेशाला प्रतिसादही दिला. निमित्त होते 33 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभाचे जालना जिल्ह्यामध्ये आज पासून एक कोटी 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या शुभारंभ झाला.

Body:सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाडिक यांच्या या संदेशामुळे शालेय विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला .यातच पावसाच्या रिमझिम सरी मध्ये परिसरामध्ये वृक्ष लागवडीचा ही आनंद लुटला आणि शिस्तीचे ही दर्शन घडविले .कन्हैया नगर परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्र च्या जागेपासून शहरातील सी. टी .एम .के .शाळेपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करून एक वेगळेच वातावरण निर्माण केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.