बदनापूर (जालना) - तालुक्यातील काजळा येथील पंतप्रधान आवास घरकूल योजनेतंर्गत मंजूर झालेली रक्कम लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी लाचेची मागणी केली. ग्रामपंचायतच्या सरपंच पतीला २० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रंगनाथ सुभाष देवकाते असे लाच घेणऱ्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती तक्रार
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील तक्रारदार यांनी २२ एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार देऊन या बाबत कळवले होते. त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, त्यांचे नाव पंतप्रधान आवास घरकूल योजनेतंर्गत १ लाख २० हजार रुपये मंजूर झाले असून त्यापैकी १५ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली व दुसरा हप्ता रुपये ४५ हजार लाभार्थीच्या खात्यावर टाकण्यासाठी काजळा गावाचे सरंपच यांचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते (वय ३२) याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
विभागाने पडताळणीनंतर रचला सापळा
लाचलुचपत विभागाकडे तक्रार येताच सदर प्रकरणाची पडताळणी केली असता आरोपी रंगनाथ देवकाते याने तक्रारदाराला अनुदानाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी ३० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पंचासमक्ष आज (दि. २९ एप्रिल) रोजी सापळा रचून काजळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात लाभर्थ्याकडून घरकूल योजनेतील ४५ हजार रुपयाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. सदरील सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस उपअधिक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, ज्ञानेश्वर म्हस्के, शिवाजी जमधडे यांनी पार पाडली.