ETV Bharat / state

जालन्यात दारु खरेदीसाठी तुफान गर्दी - दारुच्या दुकानावर गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिनांक 6 रोजी आदेश काढून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रतिष्ठाने व दुकाने बंद राहतील असे सूचित केले होते. मात्र, या आदेशाचा सर्वांनी आपल्या पध्दतीने अर्थ घेत दारूची दुकाने सुरू ठेवली होती. यामुळे दोन्ही दिवस दारूच्या दुकानांवर प्रचंड गर्दी होती.

दारुच्या दुकानावर गर्दी
दारुच्या दुकानावर गर्दी
author img

By

Published : Apr 8, 2021, 11:48 AM IST

जालना - जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिनांक 6 रोजी आदेश काढून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रतिष्ठाने व दुकाने बंद राहतील असे सूचित केले होते. मात्र, या आदेशाचा सर्वांनी आपल्या पध्दतीने अर्थ घेत दारूची दुकाने सुरू ठेवली होती. यामुळे दोन्ही दिवस दारूच्या दुकानांवर प्रचंड गर्दी होती.

काल दिवसभर दारूच्या दुकानांवर असलेली गर्दी लक्षात घेता दुकाने जीवनावश्यक वस्तू मध्ये येतात का असाही संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर दुकानांवर होणारी गर्दी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पायदळी तुडवले जाणारे आदेश यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. "करायचे एकाने आणि भरायचे दुसऱ्याने" असा हा प्रकार होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठली होती. नेमका काय आदेश आहे हे जाणून घेण्याचा ई टीव्हीच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला. राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, या आदेशाविषयी आम्ही संभ्रमात आहोत. मात्र, दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमका काय आदेश आहे हे जाणून घेऊ. त्यानंतर, जालना जिल्ह्यातील सहा वाईन शॉप, 87 देशी दारूची दुकाने आणि सुमारे 300 परमिट रूम या पूर्णतः बंद राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दारुच्या दुकानावर गर्दी

दारुची दुकानांवर गर्दी..

दारूची दुकाने बंद राहणार ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. दारूच्या दुकानावर गर्दी झाली. मात्र चारपैकी दोन दुकानदारांनी आदेश मिळताच आपली दुकाने बंद केली एका दुकानावर बाहेरून आलेला माल उतरवणे सुरू होते. मात्र, विक्री बंद होती. या विषयीची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना माहीत होती. मात्र, अंबड चौफुली पासून दारुच्या दुकानापर्यंत येण्यासाठी तब्बल पंचवीस मिनिटे वेळ लागला. या पंचवीस मिनिटांच्या संधीचे दुकानदाराने सोने करून घेतले. मग 5.30 वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाची गाडी आली. ही गाडी येण्यापूर्वीच दुकानदाराने दोन मिनिटे अगोदर व्यवहार बंद करून दुकानाला कुलूप लावले होते.

वरातीमागून घोडे..

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी पोटतिडकीने विविध उपाययोजना करीत आहेत. निर्बंध लावत आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्काच्या या "वरातीमागून घोडे" असलेल्या कारवायांमुळे त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. परिसरातील ढाब्यांवर मुक्तपणे ही दारू रिचवली जाईल. या सर्व प्रकाराकडे जसे दुर्लक्ष केले तरीही, उद्याही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.