ETV Bharat / state

नवरात्रोत्सवात मंठा येथील रेणुकामाता मंदिरात शुकशुकाट

मंठा शहराच्या उत्तरेकडील डोंगरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. 22 मार्चला कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि त्या दिवसापासून हे मंदिर बंद आहे ते आजही बंदच आहे. प्रचंड मोठा गाभारा असतानाही येथे फक्त एक ब्राह्मण आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी सध्या नवरात्रीमुळे येथे बंदोबस्तासाठी आहेत.

temple
रेणुका माता मंदिर मंठा
author img

By

Published : Oct 22, 2020, 6:02 PM IST

जालना - कोरोनाचा फटका नवरात्र उत्सवाला बसला आहे. सध्या नवरात्री सुरू आहे आणि या काळामध्ये देवी मंदिर परिसरात असलेले फुलवाले, खेळणे विक्रेते, पुजारी, ब्राह्मण यांनादेखील कोरोनाचा फटका बसला आ्हे. या छोट्या व्यावसायिकांना नवरात्रीच्या नऊ दिवसातच कमाईचा चांगला मार्ग असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंठा गावच्या शेजारील डोंगरावर वसलेल्या रेणुकामाता मंदिर परिसरात देखील यावर्षी शुकशुकाट आहे.

प्रतिनिधी दिलीप पोहनेरकर यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - 'मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर योग्य निर्णय आला नाही, तर सरकार जबाबदार'

मंठा शहराच्या उत्तरेकडील डोंगरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. 22 मार्चला कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि त्या दिवसापासून हे मंदिर बंद आहे ते आजही बंदच आहे. प्रचंड मोठा गाभारा असतानाही येथे फक्त एक ब्राह्मण आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी सध्या नवरात्रीमुळे येथे बंदोबस्तासाठी आहेत. जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची बाराही महिने येथे गर्दी असते. मात्र, देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील गाभाऱ्याच्या बाहेरूनआणि फोटोचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे भाविकांची येथे नेहमीसारखी गर्दी केली नाही. भव्यदिव्य प्रांगण, भाविकांची सुसज्ज व्यवस्था असलेला हा मंदिर परिसर भाविकांशिवाय शांतच आहे.

मंदिराच्या बाहेर ना फुलं विक्रेत्यांची दुकाने आहेत, ना लहान मुलांसाठी खेळणीची दुकाने आहेत. या मंदिरात केवळ एकच ब्राह्मण आणि पुजारी येथे नवरात्र काळातले विशेष पाठ करत आहेत. कोरोनाचा परिणाम सर्वच यंत्रणेवर झाला आहे. मंदिरांचेही उत्पन्न बुडाले आहे. या मंदिरामुळे इतर साहित्य व्यावसायिकांची उपजीविका चालत होती. कोरोनामुळे यासर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कसल्याही प्रकारची गर्दी येथे केले जात नाही. मात्र, भाविकांची श्रद्धा आजही कायम आहे. मंदिराबाहेरून भाविक दर्शन घेत असल्याचे चित्र येथे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.