ETV Bharat / state

मालकाला धमकी देऊन 'तळीराम' नेत होते बारमधून 'पार्सल', तक्रार दाखल - latest crime news in jalna

गांधीचमन भागात वरदान रेस्टॉरंट अँड बार आहे. कैकाडी मोहल्ला भागात राहणाऱ्या ऋषी भगवान जाधव आणि मिल्लत नगर येथील फईम खान कबीर खान उर्फ मॅक्स हे दोघेजण आले. त्यांनी बारमधून पार्सल न दिल्याने राडा केला.

jalna
पोलीस ठाणे
author img

By

Published : Aug 18, 2020, 10:00 PM IST

जालना - बार मालकाला वारंवार धमक्या देऊन दारूचे पार्सल घेऊन जाणाऱ्या दोन तळीरामांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असे प्रकार वारंवार घडत असतानाही मालकाने ते सहन केले. मात्र आता त्याचा अतिरेक झाल्याने बार मालकांनी दिलेल्या सूचनेवरून स्वच्छता कामगाराने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जुना जालना परिसरातील गांधीचमन भागात वरदान रेस्टॉरंट अँड बार आहे. या बारमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संतोष भिवसन काकडे हे स्वच्छता कामगार म्हणून काम करीत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काकडे काम करत असताना कैकाडी मोहल्ला भागात राहणाऱ्या ऋषी भगवान जाधव आणि मिल्लत नगर येथील फईम खान कबीर खान उर्फ मॅक्स हे दोघेजण आले. त्यांनी काकडे यांना दारूचे पार्सल मागू लागले. मात्र ते न दिल्याने या दोघांनी काकडे यांना धक्काबुक्की करून हाणामारी केली आणि हॉटेलच्या बाहेर काढले. त्याच वेळी त्याच्या खिशात असलेले 5000 रुपये देखील काढून घेतले. हा प्रकार सुरू असतानाच हॉटेलचे मालक भूषण जवाहरलाल जयस्वाल हे सोडविण्यासाठी तेथे आले. मात्र त्यांनाही धक्काबुक्की केल्याची तक्रार संतोष भिवसन काकडे यांनी दिली आहे.

या तक्रारीत असेही म्हटले आहे, की हे दोघेजण वारंवार हॉटेलमध्ये येऊन अशी धाकदपट करीत होते. मात्र मालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास घाबरत होते. परंतु काल झालेल्या या अतिरेकामुळे हॉटेलचे मालक भूषण जयस्वाल यांनी तक्रार देण्यास सांगितल्यामुळे वरील दोन्ही आरोपींविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 392 504 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.