जालना - स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवून सोशल मीडियाचा वापर कमी करावा, असे आवाहन सत्यकुमार उपाध्याय यांनी केले आहे. यूपीएससी मुख्य परीक्षेत देशातून उपाध्याय यांनी 16 वा रँक मिळवला आहे.
मराठवाड्यात खूप संघर्ष करावा लागतो
यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी मराठवाड्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्यात हिंदी माध्यमातील साहित्य या स्पर्धा परीक्षांसाठी फारसे उपलब्ध नाही. त्यामुळे हा अभ्यास करताना आणखीनच कठीण गेले. मात्र अभ्यासात सातत्य ठेवून सोशल मीडियाचा वापर कमी केल्यामुळे हे यश संपादन करणे सोपे झाले, असेही सत्यकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
हेही वाचा - 'हा तर फक्त ट्रेलर' इस्राईल दूतावासाबाहेरील स्फोटामागे इराण कनेक्शन