ETV Bharat / state

पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल म्हणतात, काम सुधारा नाहीतर 'मी पुन्हा येईन' - Jalna Traffic Issues News

औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या दरबारचे आयोजन केले होते. या दरबारात ८० टक्के नागरिकांनी शहरातील वाहतुकीविषयीच्या समस्या मांडल्या

आई.जी. रवींद्र सिंघल म्हणाले कामात सुधारणा करा
author img

By

Published : Nov 23, 2019, 8:01 PM IST

जालना - औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जनतेच्या अडचणी समजावून घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात 80 टक्के नागरिकांनी शहरातील वाहतुकी विषयीच्या समस्या मांडल्या. या प्रश्नाला वैतागलेल्या आई .जी. साहेबांनी शहर वाहतूक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांना सक्त ताकीद दिली आणि म्हणाले 'कामात सुधारणा करा, हवेतर गुन्हे नोंदवा नाही झाले तर,'मी पुन्हा येईल'.

आई.जी. रवींद्र सिंघल म्हणाले कामात सुधारणा करा

पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये शहरातील पोलिस प्रशासनाचे कौतुकच केले या कौतुका सोबतच शहरातील वाढते गुटक्याचे प्रमाण, बाहेरील राज्यातील औद्योगिक वसाहती मध्ये आलेले कामगार, वारंवार सापडत असलेले पिस्तूल या सर्व घटनांकडे नागरिकांनी लक्ष वेधले. सर्वांनी ताशेरे ओढले ते शहर वाहतूक पोलिसांवर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक आणि त्यामुळे होत असलेले अपघात याबाबत सर्वांनीच तक्रारी केल्या. पोलिस आपली जबाबदारी नगरपालिकेवर ढकलत आहेत. नगरपालिका पोलिसांवर मात्र प्रत्यक्षात मोकाट जनावरांवर कार्यवाही करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, या जनावरांना कोंडवाडा उपलब्ध करून देण्याचे काम नगरपालिकेचे आहे.

ही कायद्यातील तरतूदही ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. या तक्रारीची महानिरीक्षक साहेबांनी चांगलीच दखल घेतली आहे. या बद्दल त्यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांना विचारणा केली असता काकडे म्हणाले की, आपण नोटीस बजावल्या आहेत. मात्र, या उत्तराने त्यांचे समाधान न झाल्यामुळे नोटीस बजावून उपयोग नाही तर गुन्हे नोंदवा असा आदेशही त्यांनी दिला. याच सोबत कामात सुधारणा करा अन्यथा दीड महिन्याने मी पुन्हा येईन असा इशाराही त्यांनी दिला. याच सोबत शहरातील जनतेलाही काही सूचना त्यांनी केल्या. रस्त्यावर उभी असलेली अवैध वाहने उचलून नेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी गाडीची व्यवस्था करून त्याची अधिसूचना काढावी, शहरात सामाजिक संघटना सेवाभावी संस्थानी आर्थिक मदत करून सिग्नल बसवावेत. शहरातील वाहतुकीच्या समस्यांविषयी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि शहर वाहतूक, या तिघांनी जबाबदारी स्वीकारून दर महिन्याला नागरिकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या .

या बैठकीला पोलीस अधीक्षक चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, यांच्यासह व्यापारी रमेश तवरवला, विनीत सहानी ,जगदीश गौड, ईश्वर बिल्लोरे ,नगरसेवक संजय भगत ,रावसाहेब ढवळे, शहा आलम खान ,एडवोकेट शिवाजी आदमाने, धनसिंग सूर्यवंशी, दीपक डोके, साईनाथ चिंनदोरे,इकबाल पाशा, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होते.

Intro:औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जनतेच्या अडचणी समजावून घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारातील 80 टक्के नागरिकांनी शहरातील वाहतुकीविषयी च्या समस्या मांडल्या .या प्रश्नाला वैतागलेल्या आई .जी. साहेबांनी शहर वाहतूक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांना सक्त ताकीद दिली आणी म्हणाले 'कामात सुधारणा करा, हवेतर गुन्हे नोंदवा नाही झाले तर ,"मी पुन्हा येईल".

Body:पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये शहरातील पोलिस प्रशासनाचे कौतुकच केले या कौतुका सोबतच शहरातील वाढते गुटक्याचे प्रमाण ,बाहेरील राज्यातील औद्योगिक वसाहती मध्ये आलेले कामगार, वारंवार सापडत असलेले पिस्तूल या सर्व घटनांकडे नागरिकांनी लक्ष वेधले .सर्वांनी ताशेरे ओढले ते शहर वाहतूक पोलिसांवर. शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक आणि त्यामुळे होत असलेले अपघात याबाबत सर्वांनीच तक्रारी केल्या. तसेच पोलिस आपली जबाबदारी नगरपालिकेवर ढकलत आहेत आणि नगरपालिका पोलिसांवर मात्र प्रत्यक्षात मोकाट जनावरांवर कार्यवाही करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, आणि या जनावरांना कोंडवाडा उपलब्ध करून देण्याचे काम नगरपालिकेचे आहे .हि कायद्यातील तरतूदही ही ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली .या तक्रारीची महानिरीक्षक साहेबांनी चांगलीच दखल घेतली आहे .या बद्दल त्यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांना विचारणा केली असता काकडे म्हणाले की ,आपण नोटीस बजावल्या आहेत .मात्र या उत्तराने त्यांचे समाधान न झाल्यामुळे नोटीस बजावून उपयोग नाही तर गुन्हे नोंदवा असा आदेशही त्यांनी दिला. याच सोबत कामात सुधारणा करा अन्यथा दीड महिन्याने मी पुन्हा येईन असा इशाराही त्यांनी दिला. याच सोबत शहरातील जनतेलाही काही सूचना त्यांनी केल्या .रस्त्यावर उभे असलेले अवैध वाहने उचलून नेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी गाडीची व्यवस्था करून त्याची अधिसूचना काढावी, शहरात सामाजिक संघटना सेवाभावी संस्था यांनी आर्थिक मदत करून सिग्नल बसवावेत, शहरातील वाहतुकीच्या समस्यांविषयी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि शहर वाहतूक या तिघांनी जबाबदारी स्वीकारून दर महिन्याला नागरिकांची ची बैठक आयोजित करावी. अशा सूचनाही त्यांनी केल्या .
या बैठकीला पोलीस अधीक्षक चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार ,विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, यांच्यासह व्यापारी रमेश तवरवला, विनीत सहानी ,जगदीश गौड, ईश्वर बिल्लोरे ,नगरसेवक संजय भगत ,रावसाहेब ढवळे, शहा आलम खान ,एडवोकेट शिवाजी आदमाने, धनसिंग सूर्यवंशी, दीपक डोके, साईनाथ चिंनदोरे,इकबाल पाशा, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.