ETV Bharat / state

नाम संस्थेकडून बदनापूर तालुक्यातील गावांना मदत; १० लाख रुपयांच्या अन्न धान्य किटचे वाटप - naam distribute ration kit badnapur

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांना लॉकडाऊनदरम्यान ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांची अतिशय बिकट परिस्थिती असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेशी संपर्क साधला. संस्थेनेही सकारात्मकता दाखवत जिल्ह्यात रेशन किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला.

ration kit badnapur
नाम संस्था
author img

By

Published : Apr 30, 2020, 3:38 PM IST

बदनापूर (जालना) - बदनापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे, नागरिकही घरातच राहून कोरोनामुक्तीच्या लढाईत सहभागी झाले आहेत. परंतु, लॉकडाऊन पाळत असताना शहरातील काही कुटुंबांकडील जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत. अशांच्या मदतीला मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांची 'नाम फाऊंडेशन' धावून आली असून संस्थेतर्फे १० लाख रुपयांचे अन्नधान्य किट तालुक्यातील विविध गावांमध्ये वाटप केले जात आहे.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांना लॉकडाऊनदरम्यान ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांची अतिशय बिकट परिस्थिती असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेशी संपर्क साधला. संस्थेनेही सकारात्मकता दाखवत जिल्ह्यात रेशन किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार जालना जिल्ह्यातील नामचे संयोजक भाऊसाहेब घुगे आणि इतर समन्वयक यांच्यामार्फत जवळपास १० लाख रुपयांचे रेशन किट बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वितरित केले जात आहे.

पाडळी, धोपटेश्वर यासह इतर गावांमध्ये किटचे वाटप करण्यात आले आहे. किटमध्ये तांदूळ, गहू, तेल, कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश असल्याची माहिती भाऊसाहेब घुगे यांनी दिली. तालुक्यातील पाडळी येथे रेशन किटचे वाटप सुरू करण्यात आले असून या वेळी घुगे यांच्यासह आनंद इंदाणी, किशोर शिरसाठ, सिद्धेश शेळके यांच्यासह नाम संस्थेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित हेाते.

हेही वाचा- सूरतहून आलेली 17 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, खासदार दानवेंच्या तालुक्यात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.