ETV Bharat / state

दानवेंची जीभ पुन्हा घसरली, शरद पवारांवर टीका करताना केले आक्षेपार्ह वक्तव्य

खासदार दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आणि आपण केलेल्या विकास कामांचा पाढा वाचताना विरोधकांवर टीका करण्याची ही संधी त्यांनी सोडली नाही

दानवेंची जीभ पुन्हा घसरली
author img

By

Published : Apr 21, 2019, 12:08 PM IST

जालना - भाजप सरकारने व्यापाऱ्यांना जीएसटी आणि नोटबंदीच्या माध्यमातून दिलेल्या जखमांवर लेप लावण्यासाठी जालन्यामध्ये "आमरस पे चर्चा" या कार्यक्रमाचे आयोजन केले. यासाठी मारवाडी, सिंधी आणि गुजराती या तीन समाजातील व्यापाऱ्यांना आणि याच समाजातील ३ राजकीय नेत्यांना बोलावून व्यापाऱ्यांच्या जखमेवर आमरसाचा लेप लावून पुन्हा एकदा मोदींना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

या दरम्यान बोलत असताना जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार असलेल्या खासदार दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आणि आपण केलेल्या विकास कामांचा पाढा वाचताना विरोधकांवर टीका करण्याची ही संधी त्यांनी सोडली नाही. ज्यावेळेस यांना सगळे जमत होते त्यावेळेस हे आमच्यासोबत होते. मात्र, आता विरोधी पक्षात असल्यामुळे या खरकट्या तोंडाच्यांना आम्ही जातीयवादी दिसत आहोत" असे म्हणत दानवेंनी शरद पवार, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मायावती यांच्यावर निशाणा साधला.

दानवेंची जीभ पुन्हा घसरली

खास व्यापाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे विचार आणि भूमिका समजावून घेणे तसेच समाजाच्या अपेक्षा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने केलेली नोटबंदी आणि लागू केलेला जीएसटी यामुळे व्यापारी वर्ग नाराज असल्याची उपरती भाजप सरकारला आता अंतिम टप्प्यात लक्षात आली. त्यामुळे व्यापारी वर्गाला या दोन्ही गोष्टी कशा चांगल्या आहेत हे पटवून देण्यासाठी आता व्यापारीच नेते बोलावले आहेत.

व्यापाऱ्यांसाठी "आमरस पे चर्चा" दुष्काळग्रस्तांसाठी काय?

रावसाहेब दानवे यांनी व्यापाऱ्यांची समजुत काढण्यासाठी आमरसाचा लेप लावला. मात्र दुष्काळात होरपळत असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्नही या चर्चेच्या निमित्ताने निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आत्तापर्यंत फक्त दोनच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यापेक्षाही भयानक परिस्थिती म्हणजे खाजगी संस्थांच्या गो शाळांमध्ये जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी नसल्यामुळे फेब्रुवारीमध्येच बाजिउम्रद येथील गोशाळेतील दोन गाईंचा चाऱ्याअभावी तडफडून मृत्यू झाला. याचा अहवाल ही शासनाने दिला आहे, असे असतानाही चाऱ्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना, बळीराजांला आपल्याकडे वळविण्यापेक्षा व्यापाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. या चर्चेला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, यांच्यासह शहरातील प्रमुख व्यापारी सुखदेव बजाज, डॉक्टर स्वप्नील मंत्री, प्रवीण मेहता, शांतीलाल काथोड ,विजय जैन ,घनश्यामदास गोयल, जनसंघाचे काबरा यांची उपस्थिती होती.

Intro:भाजपा सरकारने व्यापाऱ्यांना जीएसटी आणि नोट बंदी च्या माध्यमातून दिलेल्या जखमांवर लेप लावण्यासाठी जालन्यामध्ये "आमरस पे चर्चा "या कार्यक्रमाचे रात्री आयोजन करण्यात आले होते. यासाठी मारवाडी, सिंधी ,आणि गुजराती यातीन समाजातील व्यापाऱ्यांना आणि याच समाजातील 3 राजकीय नेत्यांना बोलावून व्यापाऱ्यांच्या जखमेवर आमरसाचा लेप लावून पुन्हा एकदा मोदींना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. खास व्यापाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे विचार व भूमिका समजावून घेणे व समाजाच्या अपेक्षा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खास उपस्थितांमध्ये राज के पुरोहित (कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र विधानसभा )डॉक्टर गुरुमुख जगवानी (राज्यमंत्री दर्जा ,जळगाव )राजेंद्र पाटणी (वाशिम )यांची उपस्थिती होती.

Body:मोदी सरकारने केलेली नोटबंदी आणि लागू केलेला जीएसटी यामुळे व्यापारी वर्ग नाराज असल्याची उपरती भाजप सरकारला आता अंतिम टप्प्यात लक्षात आली. आणि व्यापारी वर्गाला या दोन्ही गोष्टी कशा चांगल्या आहेत हे पटवून देण्यासाठी आता व्यापारीच नेते बोलावलेले आहेत.
प्रास्ताविकात आयोजकांनी सिंधी, मारवाडी ,आणि गुजराती ती या तिन्ही समाजाच्या व्यापाऱ्यांचा उल्लेख केला मात्र मराठा समाजाचा उल्लेख न केल्यामुळे रावसाहेब दानवे यांनाही आपण मराठा असल्याची जाणीव झाली आणि त्यांनीदेखील मराठ्यांचा उल्लेख करण्यासाठी भाग पाडले. या सर्व परिस्थितीत आजारातून उठलेल्या जालना लोकसभेचे भाजपाचे उमेदवार असलेल्या खासदार दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आणि आपण केलेल्या विकास कामांचा पाढा वाचतानाच विरोधकांवर टीका करण्याची ही संधी सोडली नाही ते म्हणाले"ज्यावेळेस ह्यांना सगळे जमत होते त्यावेळेस हे आमच्यासोबत होते मात्र, आता विरोधी पक्षात बसल्यामुळे या भडव्यांना आणि खरकट्या तोंडाच्याना आम्ही जातियवादी दिसत आहोत" असे म्हणत शरद पवार, ममता बॅनर्जी ,उमर अब्दुल्ला ,फारुख अब्दुल्ला ,मायावती, यांच्यावर निशाणा साधला .त्यानंतर खास व्यापाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी बोलावलेल्या राज के .पुरोहित, गुरुमुख जगवाणी, राजेंद्र पाटणी, यांनी व्यापाऱ्यांना समजावून सांगत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा चांगला फायदा कसा झाला ,समृद्धी महामार्गा चा फायदा जीएसटी चा फायदा ड्रायपोर्ट चा फायदा हा कसा झाला आणि यापुढे कसा होणार आहे याचे गुणगान गायले .

*व्यापाऱ्यांसाठी "आमरस पे चर्चा" दुष्काळग्रस्तांसाठी काय?*

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आणि जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी व्यापाऱ्यांच्या समजुत काढण्यासाठी आमरसाचा लेप लावला मात्र दुष्काळात होरपळत असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्नही या चर्चेच्या निमित्ताने निर्माण झाला आहे .जालना जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आत्तापर्यंत फक्त दोनच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत .यापेक्षाही भयानक परिस्थिती म्हणजे खाजगी संस्थांच्या गो शाळांमध्ये जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी नसल्यामुळे फेब्रुवारीमध्येच बाजिउम्रद येथील गोशाळेतील दोन गाईंचा चाऱ्याअभावी तडफडून मृत्यू झाला. याचा अहवाल ही शासनाने दिला आहे असे असतानाही चाऱ्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना, बळीराजांला आपल्याकडे वळविण्यापेक्षा व्यापाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न भाजप जास्त करीत आहे .याउलट भाजपचे प्रतिस्पर्धी अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांनी ग्रामीण भागामध्ये सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच अवताडे यांना आम आदमी पार्टीने प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांच्या सोबतचे संबंध तरी जुळवून घेतले असले तरीही ही शिवसैनिकांच्या मनामध्ये भाजपा बद्दल नाराजी नाही मात्र रावसाहेब दानवे यांनी या शिवसैनिकांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्या मनात फक्त खा.दानवे यांच्या बद्दल असंतोष खदखदत आहे. हा असंतोष देखील मतदानाच्या दिवशी बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हादरलेल्या भाजपाने व्यापाऱ्यांना वळविण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी आणि खास करून मारवाडी गुजराती आणि सिंधी समाजातील नेत्यांना बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.
आजच्या या चर्चेला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ,यांच्यासह शहरातील प्रमुख व्यापारी सुखदेव बजाज, डॉक्टर स्वप्नील मंत्री, प्रवीण मेहता, शांतीलाल काथोड ,विजय जैन ,घनश्यामदास गोयल, जनसंघाचे काबरा, आदींची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.