ETV Bharat / state

राम मंदिर भूमिपूजन : बदनापुरात जल्लोष; मंत्री दानवे, आमदार कुचे उपस्थित

author img

By

Published : Aug 5, 2020, 10:06 PM IST

बदनापूर येथील श्रीराम मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी राम नामाचा जयघोष करत मोठा जल्लोष करण्यात आला. त्या वेळी झालेल्या कारसेवेत सहभागी असलेल्यांचा सत्कार मंत्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला.

बदनापुरात जल्लोष; मंत्री दानवे, आमदार कुचे उपस्थित

बदनापूर (जालना) - अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असतानाच बदनापूर येथील श्रीराम मंदिरातही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत महाआरती करून जल्लोष करण्यात आला. यावेळी कारसेवकांचाही सत्कार करण्यात येऊन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

बदनापूर येथील श्रीराम मंदिरात केंद्रीय मंत्री दानवे आणि आमदार कुचे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी राम नामाचा जयघोष करत मोठा जल्लोष करण्यात आला. तीन दशकाच्या प्रतीक्षेनंतर मंदिर उभारणीस सुरुवात झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी झालेल्या कारसेवेत सहभागी असलेल्यांचा सत्कार मंत्री दानवे व आमदार कुचे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी बद्री पठाडे, वसंत जगताप, पदमाकर जऱ्हाड, भीमराव भूजंग, भगवान मात्रे, विलास जऱ्हाड, गणेश कोल्हे, प्रदीप साबळे, सत्यनाराण गिल्डा, संतोष पवार, बाबासाहेब कऱ्हाळे, प्रसाद मंत्री, शांतीलाल मंत्री, राजेश तिवारी, बाबुलाल मंत्री, विष्णू मंत्री, अमर मंत्री, सचिन जोशी, प्रविण बुऱ्हाडे, बालाजी वाघ, बालाजी वाघ, वरुण दुधानी, राजू तापडिया, गोरखनाथ खैरे , संदीप पवार, दिपक मुंडलीक, महेश लड्डा, सतीश साबळे, आसाराम गरड, रघू होळकर, भास्कर घनघाव, सुधीर पवार, गजानन काटकर, नंदू शेळके, अरूण पठाडे, शरद गिते, कैलास दुधाणी, दीपक जोशी, संतोष दुधनी आदी उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळा सुरू असतानाच रामभक्तांकडून येथील श्रीराम मंदिरासमोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची मोठी आतषबाजी करण्यात येऊन रामनामाचा मोठा जयघोष करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.