जालना - नेत्रदान व अवयव दान याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने आज शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीचे आयोजन एकात्मीक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प, अंगणवाडी कर्मचारी, लिओ क्लब ऑफ जालना डायमंड, भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार संघटना यांनी केले होते.
कादराबाद, नेहरू रोड,मामा चौक, मार्गे महावीर चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. महिला शिक्षकांच्या हातात विविध घोषवाक्याचे फलक झळकत होते. यामध्ये श्री गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जालना डायमंड चे अध्यक्ष दिनेश शिनगारे जिवनराव केंढे, सय्यद अफसर, यांच्यासह अनेक पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. मरणोत्तर नेत्रदान करून सृष्टी बघा, नेत्रदानासाठी कोणताही खर्च नाही, सर्व धर्माची अशा नेत्रदान व अवयवदान आला मान्यता आहे. अशा विविध प्रकारच्या घोषणा लिहिलेले फलक विद्यार्थी व शिक्षकांच्या हातात होते.