जालना - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून सध्या पवार घराण्यावर टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार घराण्याला 'आदर्श घराणे' म्हणत वादाविषयी सारवासारव केली आहे.
शरद पवार यांनी पार्थबद्दल केलेले वक्तव्य हे त्याच्या घरातील अंतर्गत प्रकरण आहे. याचा राजकारणावर कसलाही परिणाम होणार नाही. पार्थ पवार हा माझा चांगला मित्र आहे आणि एकूणच पवार घराणे हे आदर्श घराणे आहे, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.
दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीत खासगी रुग्णालय जर नियमबाह्य काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. माध्यमांनी टोपे यांना सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले.