ETV Bharat / state

लसीकरणाची तयारी पूर्ण, कोणती लस द्यायची या विषयी संभ्रम - Corona vaccination

जालन्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील विविध आठ ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे.

लसीकरणाची तयारी पूर्ण, कोणती लस द्यायची या विषयी संभ्रम
author img

By

Published : Jan 11, 2021, 7:30 PM IST

Updated : Jan 11, 2021, 9:23 PM IST

जालना - महाराष्ट्रामध्ये covid-19ची प्रत्यक्ष लस देण्याच्या कार्यक्रमाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातून फक्त दोन जिल्ह्यांची निवड या लसीकरणासाठी करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये जालना एक आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून तयारीही पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र, कोविशील्ड का को वॅक्सिंन यापैकी कोणती लस द्यायची याचा निर्णय मात्र अजून झालेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अजून संभ्रमात आहे.

लसीकरणाची तयारी पूर्ण, कोणती लस द्यायची या विषयी संभ्रम

जिल्ह्यात 8 याठिकाणी देण्यात येणार लस -

जालना जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयांमध्ये लाभार्थींना ही लस देण्यात येणार आहे ती ठिकाणे पुढीलप्रमाणे.

सामान्य रुग्णालय जालना
उपजिल्हा रुग्णालय अंबड
ग्रामीण रुग्णालय भोकरदन
ग्रामीण रुग्णालय घनसांगवी
ग्रामीण रुग्णालय मंठा
ग्रामीण रुग्णालय परतुर
प्राथमिक आरोग्य केंद्र खासगाव
प्राथमिक आरोग्य केंद्रशेलगाव

ड्राय रन नंतर त्रुटीमध्ये दुरुस्ती -

दोन जानेवारीला लस देण्यासंदर्भात ड्रायरन घेण्यात आले होते, त्यावेळी ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड मुळे कोणत्याही रुग्णाला परत पाठविले जाणार नाही, कोविन पोर्टल मध्ये आधार कार्ड सोडून इतर ओळखपत्र जशी, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र अशा प्रकारांच्या ओळखपत्रावर देखील ही लस दिली जाणार आहे. कोविद पोर्टल मध्ये आधार कार्ड नसले तरीही ही लस देण्यासाठी विहित ओळखपत्रावर लस देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आधार कार्ड नसले तर कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही .

पाच जणांची टीम -

ही लस देण्यासाठी पाच जणांची टीम तयार करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, किती लाभार्थ्यांना हि लस द्यायची याविषयी मात्र अजून निश्चित आकडा ठरलेला नाही. ज्यांना द्यायची आहे अशांची यादी तयार आहे. मात्र, किती लस येणार आणि किती जणांना द्यायची हे मात्र अद्याप पर्यंत ठरले नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 11, 2021, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.