ETV Bharat / state

Jalna Crime: पत्नी व प्रियकराच्या संबंधात पती ठरला 'व्हिलन'; दोघांनी केला त्याचा 'गेम'

जालना शहरात 7 मे रोजी टीव्ही सेंटर भागात घडलेल्या प्रमोद झिने हत्याकांडाला नवीन कलाटणी मिळाली आहे. कारण प्रमोदचे खरे मारेकरी त्याची पत्नी आशा आणि तिचा प्रियकर रूपेश शिंदे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सुरुवातीला आशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका स्थानिक महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. पण, खरे मारेकरी पत्नी व तिचा प्रियकर निघाल्याने पोलिसांनी धक्काच बसला.

Jalna Crime
पती ठरला 'व्हिलन'
author img

By

Published : May 14, 2023, 8:08 PM IST

जालना: शहराच्या टीव्ही सेंटर भागातील ४० वर्षीय प्रमोद झिने याचा ७ मे रोजी सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणात मयताची पत्नी आशा झिने हिने केलेल्या तक्रारीवरून त्याच भागातील एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी संबंधित महिलेला अटकही केली होती. आशा हिने दिलेल्या तक्रारीत प्रमोद झिने याचे त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्या महिलेने प्रमोदचा खून केल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान, प्रमोद झिने यांच्या खून प्रकरणातील खऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी या गुन्ह्यातील खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पत्नीच्या अनैतिक संबंधात पती संपला: आशा झिने हिचे रेवगाव येथील रूपेश योहानराव शिंदे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामध्ये प्रमोद अडसर होऊ लागला होता. या कारणाने आशा आणि रूपेश शिंदे यांनी गेल्या महिन्यातच प्रमोद याच्या खुनाचा कट रचला होता. ६ मे च्या रात्री प्रमोद मद्यप्राशन करून झोपल्याची संधी साधून दोघांनी मिळून त्याचा खून केला.

खरे आरोपी गजाआड: पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या खूनाने टिव्ही सेंटर परिसरात खळबळ माजली होती. स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा आणि तिचा प्रियकर रूपेश शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पथकाने या खुनातील खऱ्या आरोपींचा छडा लावला आहे.

कोर्टाने 'त्या' महिलेच्या अटकेची परवानगी नाकारली: या खून प्रकरणात तक्रारदार आशा झिने हिच्या तक्रारीनुसार आरोपी करण्यात आलेल्या महिलेला अटक करण्यासाठी तालुका जालना पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तेव्हाच न्यायालयाला हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने न्यायालयाने त्या महिलेच्या अटकेला परवानगी नाकारली होती. आता पोलिसांनी चक्रे फिरवून खऱ्या खुनी महिलेचा पर्दाफाश केला आहे. प्रमोद याच्या पत्नीनेच तिच्या अनैतिक संबंधात अडसर होऊ लागलेल्या पतीचा खून करून घेतल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा:

  1. Husband Knife Attack On Wife : 'नोकरीवाली बायको दे गा देवा', पण 'या' नवऱ्याला चढला माज; बायकोवर चाकूहल्ला
  2. Imtiaz Jalil Allegation : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चालते 20 टक्के कमीशनखोरी; खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
  3. Sanjay Shirsat On Cabinet Expansion : ​​केंद्रात शिवसेनेला दोन मंत्री पदे मिळतील; संजय शिरसाट यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.