ETV Bharat / state

Prakash Ambedkar on Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, घेतली मनोज जरांगेंची भेट - Maratha Andolan

Prakash Ambedkar on Maratha Reservation : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेत्यांनी आज मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. जरांगे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. (Manoj Jarange Hunger Strike)

Manoj Jarange Hunger Strike
मराठा आंदोलन स्थळी भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 7:14 PM IST

प्रकाश आंबेडकरांनी दिली मराठा आंदोलन स्थळी भेट

जालना Prakash Ambedkar on Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलन सुरू आहे (Manoj Jarange Hunger Strike). या आंदोलनस्थळी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिलीय. जालन्यात दडपशाहीचं राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केलीय. पोलिसांनासुद्धा सल्ला दिलाय की, तुम्हीसुद्धा माणूस आहात. आम्हीसुद्धा माणूस आहे, त्यामुळे दोघांनीही एकमेकांसोबत माणुसकीने वागलं पाहिजे. त्यामुळे राजकारण्यांचं ऐकू नका. कोणालाही मारू नका. कारण राजकारणी हे लाठीचार्ज करण्याचा लेखी आदेश ते देत नसतात. त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात अडकत नाहीत. तसंच यावेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेधसुद्धा त्यांनी व्यक्त केलाय.

प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन : जरांगे-पाटील यांची नाजूक स्थिती पाहून प्रकाश आंबेडकरांनी त्यांना आंदोलन यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. सरकार आंदोलकांना लक्ष्य करू शकते. मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो की, जरांगे-पाटील यांनी 'मरण्या'बद्दल बोलू नये, असे ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांकडे सरकार झुकलं नाही तर मंगळवारपासून पाणीही सोडू, असा पुनरुच्चार जरांगे-पाटील यांनी केलाय. (Prakash Ambedkar visit Maratha Protest in Jalna)

आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आणि कटिबद्ध : माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह सरकारी प्रतिनिधींनी आज सकाळी जरांगेंची भेट घेतली. त्यांनी मागणीनुसार दोन दिवसांत जीआर जारी करण्यावर मर्यादा असल्याचं मत व्यक्त केलंय. कारण कायदेशीर बाबीही तपासाव्या लागतील, असं ते म्हणालेत. त्यानुसार त्यांनी जरांगे-पाटील यांना त्यांचं बेमुदत उपोषण मागे घ्यावं. सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन सरकारला वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी द्यावा, असं आवाहन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आणि कटिबद्ध असल्याचं ठाम विधान केलं आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागेल, असा पुनरुच्चार त्यांनी केलाय. (Maratha Protest in Jalna)

आंदोलकांचा जामीन मंजूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी अंतरवली सराटी या ठिकाणी आंदोलन सुरू असताना शांततेनं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात याचे पडसाद उमटलेत. या प्रकरणी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जवळपास जिल्ह्यात तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हा वकील संघाच्या वतीनं आंदोलक कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याप्रकरणी मोफत जामीन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वकील संघाच्या वतीने आज 33 जणांचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयानं एका अल्पवयीनास यापूर्वीच जामीन मंजूर केला. उर्वरित 32 जणांचा जामीन आज जिल्हा सत्र न्यायालयानं प्रत्येकी पंधरा हजाराच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केलाय.

हेही वाचा :

  1. Maratha Andolan : शांततेत सुरू असलेलं मराठा आंदोलन कसं झालं हिंसक? मराठा क्रांती मोर्चा समन्वयक म्हणतात...
  2. Maratha Andolan: अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास उद्रेक, सकल मराठा समाजाचा इशारा
  3. सोलापूर जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चा.. अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.