ETV Bharat / state

जालना: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांची कारवाई; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Oct 22, 2020, 2:51 PM IST

बालाजी शंकरराव ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबर), रवी अशोक ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबरे) अशी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांना वाळू चोरी करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन टॅक्टर ट्रॉलीसह १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त केलेला ट्रॅक्टर
जप्त केलेला ट्रॅक्टर

जालना - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना भोकदरन पोलिसांनी दणका दिला आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर भोकरदन पोलिसांनी कारवाई करून १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बालाजी शंकरराव ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबर), रवी अशोक ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबरे) अशी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत.
त्यांना वाळू चोरी करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन टॅक्टर ट्रॉलीसह १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक जालना विक्रांत देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहायक पोलीस निरीक्षक भिकुलाल वडदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भोपळे,पोलीस कॉन्सेटबल निकम, गायकवाड आदींनी सहभाग घेतला आहे. यापुढे अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.