ETV Bharat / state

जालना : 'त्या' चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिस्टलसह चोरीचा मुद्देमाल जप्त - जालना जिल्हा लेटेस्ट न्यूज

सदर बाजार परिसरातील वसुंधरा नगरात दिनांक 9 मे रोजी भर दुपारी गावठी पिस्तूल दाखवून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. सावरमल जाला असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. चोरट्यांनी त्यांच्याकडून 60 हजारांचे दागिने लुटून पोबारा केला होता. पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना या गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन पिस्टल व सोन्याचे दागिने मिळवण्यात यश आले आहे.

चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिस्टलसह चोरीचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : May 24, 2021, 7:21 PM IST

जालना - सदर बाजार परिसरातील वसुंधरा नगरात दिनांक 9 मे रोजी भर दुपारी गावठी पिस्तूल दाखवून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. सावरमल जाला असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. चोरट्यांनी त्यांच्याकडून 60 हजारांचे दागिने लुटून पोबारा केला होता. पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना या गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन पिस्टल व सोन्याचे दागिने मिळवण्यात यश आले आहे. पोलिसांनी एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

व्यापारी सावरमल जाला यांना नळ दुरुस्तीचे साहित्य मागण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तीघे जण आले होते. नळाच्या दुरुस्तीसाठी एलबो द्या अशी मागणी ते करू लागले, सुरुवातीला नाही म्हटल्यावर पुन्हा अर्ध्या तासाने हे तिघे आले आणि साहित्य देण्याचा आग्रह करू लागले. त्यामुळे सावरमल जाला हे घरात वळाले त्याचवेळी या तीन आरोपींनी गेटवरून घरात उड्या मारल्या आणि पिस्टलचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठी काढून घेतली. दरम्यान घरात लुटमार करण्याच्या उद्देशाने एक जण घरात गेला त्याच वेळी सावरमल जाला आणि दुसर्‍या एका आरोपीमध्ये झटापट झाल्यामुळे चोरट्यांचे नियोजन फसले व त्यांनी पोबारा केला.

चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिस्टलसह चोरीचा मुद्देमाल जप्त

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र ते या संदर्भात काहीच माहिती सांगत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात चार वेळेस पोलीस कोठडीची मागणी केली. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये दरोडेखोरांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र, पिस्टल, आणि पळविलेले सोने पोलिसांच्या ताब्यात दिले.

फरार आरोपींचा शोध सुरू

दरम्यान याप्रकरणी अकाल सिंग राजू सिंग जुनी, 20 राहणार माहाडा कॉलनी जालना. राजू शामराव सुरासे 48, साईनगर देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा. प्रदीप केशव नरवडे 30, राहणार टीव्ही सेंटर माहाडा कॉलनी जालना. यांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोन आरोपी फरार असून, त्यांच्या शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

होही वाचा - सॉरी पापा, आत्महत्या करतेयं! व्हिडिओ करुन तरुणीने संपवलं आयुष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.