ETV Bharat / state

जालन्यात शेतकऱ्याची लुबाडणूक प्रकरणी ७ खासगी सावकारांच्या घराची झडती - lender

नेर येथील रहिवाशी माणिकराव नारायणराव खंडागळे यांनी दिनांक ६ मे रोजी सहाय्यक निबंधकांकडे या सावकारांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्याकरता सहाय्यक निबंधक यांनी सुभाष राठोड (सहकारी अधिकारी श्रेणी १) यांच्या अध्यक्षतेखाली घर झडती पथकाची नियुक्ती केली होती. या झडतीमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे या समितीला मिळाली आहे.

जालन्यात शेतकऱ्याची लुबाडणूक प्रकरणी ७ खासगी सावकारांच्या घराची झडती
author img

By

Published : May 17, 2019, 10:01 PM IST

जालना - तालुक्यातील नेर येथे अवैध सावकारी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या सावकारांच्या निवास स्थानी सहकार विभागाच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी धाड टाकून कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये सकाळी ९ ते दुपारी ७ या वेळेत खाजगी सावकाराच्या घरांची झडती घेण्यात आली.

नेर येथील रहिवाशी माणिकराव नारायणराव खंडागळे यांनी दिनांक ६ मे रोजी सहाय्यक निबंधकांकडे या सावकारांविरोधात तक्रार केली होती. खंडागळे यांनी मारुती अश्रुबा जाधव, सिंधू धर्मा तौर, बाळू बाबू गिरी, विमल शिवाजी गिरी, कौसाबाई आसाराम उफाड, रामेश्वर जिजाभाऊ काकडे, वंदना प्रभाकर उफाड, कैलास गिरी, उषा विलास गिरी, चंद्रकला सुरेश उफाड, राणी अशोक उफाड, (सर्व र.नेर) यांच्याकडून वेळोवेळी कर्जरूपात रक्कम घेतली होती. त्यांचे पैसे परत करूनही ते पुन्हा पैशांची मागणी करत आहेत. तसेच आपणास जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे खंडागळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची चौकशी करण्याकरता सहाय्यक निबंधक यांनी सुभाष राठोड (सहकारी अधिकारी श्रेणी १) यांच्या अध्यक्षतेखाली घर झडती पथकाची नियुक्ती केली होती. या झडतीमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे या समितीला मिळाली आहे. समितीने ती कागदपत्रे जप्त केली असून पुढील कार्यवाही सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पथकात सहकार अधिकारी पी. व्ही. गावंडे, महेश जयरंगे, एन.डी. बेडवाल, बी.एल .बाबर, खांडेभराड, गायकवाड, यांचा समावेश होता.

Intro:7 खाजगी सावकारांच्या घराची झडती,
आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.

जालना तालुक्यातील नेर येथे अवैध सावकारी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या सावकारांच्या निवास स्थानी जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी धाडीटाकून कारवाई केली. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत 7 खाजगी सावकाराच्या घरांची झडती घेण्यात आली.

जालना तालुक्यातील नेर येथील रहिवाशी माणिकराव नारायणराव खंडागळे यांनी दिनांक 6 मे रोजी सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती, या तक्रारीमध्ये त्यांनी मारुती अश्रुबा जाधव,सिंधू धर्मा तौर, बाळू बाबू गिरी ,विमल शिवाजी गिरी, कौसाबाई आसाराम उफाड ,रामेश्वर जिजाभाऊ काकडे ,वंदना प्रभाकर उफाड, कैलास गिरी, उषा विलास गिरी ,चंद्रकला सुरेश उफाड,राणी अशोक उफाड,सर्व र.नेर यांच्याकडून वेळोवेळी कर्जरूपात रक्कम घेतली होती. सदरील रक्कम परत करूनही वरील सर्व खाजगी सावकार त्यांना पुन्हा पैशाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशा प्रकारची तक्रार खंडागळे यांनी केली होती ,या तकररीची चौकशी करण्याकरिता आणि घराची झडती घेण्यासाठी सहाय्यक निबंधक यांनी सुभाष राठोड सहकारी अधिकारी श्रेणी 1, यांच्या अध्यक्षतेखाली घर झडती पथकाची नियुक्ती केली होती. या पथकात सहकार अधिकारी पी व्ही गावंडे ,महेश जयरंगे, एन.डी. बेडवाल, बी.एल .बाबर, खांडेभराड, गायकवाड ,यांचा समावेश होता. या पथकाने आज दिनांक 17 रोजी नेर येथील वरील सावकारांच्या घराची झाडाझडती घेतली. या झडती मध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे या समितीला मिळाली आहे. समितीने ती कागदपत्रे जप्त केली असून पुढील कार्यवाही सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.Body:FotoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.