ETV Bharat / state

कोरोनाशी लढा; नागरिकांच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांची आरोग्य तपासणी - संचारबंदी

काम वाढल्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढलेला आहे. पोलीस अधिकारी-कर्मचारी सद्यस्थितीत 12 ते 13 तास आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

jan
पोलिसांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टर
author img

By

Published : Apr 27, 2020, 11:58 AM IST

जालना - संचारबंदीत पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढलेला असून जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना 12 ते 13 तास काम करावे लागत आहे. सध्या उन्हाचा तडाखाही वाढल्याने विपरीत परिस्थितीत काम करताना पोलिसांनाही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून बदनापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी–कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून संचारबंदी तसेच जिल्हाबंदी करण्यात आलेल्या आहेत. काम वाढल्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढलेला आहे. पोलीस अधिकारी-कर्मचारी सद्यस्थितीत 12 ते 13 तास आपली जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या उन्हाचा तडाखाही वाढलेला असताना गस्त घालणे, चेक पोस्टवर थांबणे, फिक्स पॉईंटवर कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्याही आरेाग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांनी पुढाकार घेऊन बदनापूर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यावेळी जालना येथील संजीवनी रुग्णालयाचे डॉ. बळीराम बागल, डॉ. अक्षय पांचाळ, योगेश जोशी, विनोद गायकवाड, दत्ता भेरे यांच्या वैद्यकीय टिमने आरोग्य तपासणी केली.

यावेळी पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे, शेख, अनिल चव्हाण, वनारसे, शेळके, जारवाल, डोईफोडे, विजय राठोड, रियाज पठाण, शिवाजी भगत, सुलाने, विलास साळवे, चंद्रशेखर मांटे आदींसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्डची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.