ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घराण्यातील तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - सदर बाजार पोलीस

शहरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून बिअरच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Arrested
सदर बाजार पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 17, 2020, 5:19 PM IST

जालना - सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून बिअरच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण उच्चभ्रू घराण्यातील तरुण आहेत.

जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा, उच्चभ्रू घराण्यातील तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सदर बाजार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नवीन जालन्यातील हॉटेल बगडिया इंटरनॅशनलच्या पाठीमागील इमारतीमध्ये काही तरुण तीन पत्त्याचा तिरट नावाचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. तसेच तिथे मद्यप्राशन केल्या जात असल्याचेही खबऱ्याने सांगितले. या माहितीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी छापा मारला. यावेळी दुर्गेश संतोष अग्रवाल ( 26, रा अजिंठा नगर ) आकाश उमाशंकर अग्रवाल ( 28, रा. संभाजीनगर ) आनंद खुशाल नाईक ( 37 ,रा संभाजीनगर ) रमन सुनील नंदागिरे ( 28 ,संभाजीनगर ) जितेश रामलाल तलरेजा ( 30, रा बडी सडक ) योगेश शामलाल जैन ( 30, बडी सडक ) संजय जनार्दन गोमटे ( मराठा बिल्डींग ) आशिष नरेंद्र मित्तल ( 32, संभाजीनगर ) आणि तुषार भगवानदास अग्रवाल ( 22, रा संभाजीनगर ) या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या जुगाऱ्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, यासह बिअरच्या 12 बॉटल, एक बॉक्स असा एकूण सुमारे 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार होण्यासारखी परिस्थिती असताना तोंडाला मास्क न लावणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेले हे नऊ तरुण उच्चभ्रु घराण्यातील असल्यामुळे याविषयी चर्चा रंगली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.