ETV Bharat / state

Father Hanged His Daughter : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीला बापानेच दिली फाशी

author img

By

Published : Dec 14, 2022, 10:26 PM IST

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीला बापानेच फाशी ( Father Hanged His Daughter ) दिल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातील पिंपळगाव शिवारात घडली ( The father hanged the girl at Pimpalgaon in Jalna district ) आहे. या प्रकरणी दोघांवर चंदन जीरा पोलीस स्टेशनमध्ये ( Chandanzira police station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandanzira police station
Chandanzira police station

जालना - मुलगी काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने बापाने मुलीला फाशी दिली आहे. समाजात अपमान झाल्याचा राग मनात धरून चक्क बापाने मुलीला फाशी ( The father hanged the girl at Pimpalgaon in Jalna district ) देऊन अंत्यविधी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्यात ( Chandanzira police station ) मुलीचा बाप संतोष भाऊराव सरोदे ( Santosh Bhaurao Sarode ) नामदेव भाऊराव सरोदे ( Namdev Bhaurao Sarode ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचा परस्पर अत्यंविधी - याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक 14/12/2022 रोजी राजुर रोडवर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक पोहार यांच्यासह त्यांचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यांना पिरपिंपळगाव शिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे या व्यक्तीने पोटाच्या मुलीला फाशी दिल्याची माहिती मिळाली होती. तसेच वडिलांनी मुलीचा परस्पर अत्यंविधी केला होता. त्यावरून पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलीस पाटील बावणे यांना संपर्क साधला. त्यांनी संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जावून मिळालेल्या माहितीच्या संबंधाने चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मुलगी नामे सुर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (वय 17 वर्ष) ही मागील दोन तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्याची माहिती मिळाली.

समाजात अपमान झाल्याने दिली फाशी - मुलगी मंगळवारी ( दि. 13 ) दुपारी घरी आल्यानंतर तिची वडीलांनी चौकशी केली होती. त्यावेळी तीचा वडीलांसोबत वाद झाला होता. सुरेखा आम्हाला काही न सांगता घरातून गेल्याने आमचा अपमान झाला होता. त्यावरुन दुपारी 04.00 च्या दरम्यान तिला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देवुन मारल्याची कबूली तीच्या वडीलांनी दिली. नंतर संध्याकाळी तिचा अत्यंविधी केल्याचे सांगीतले. त्यावरुन पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता पोल्टी फॉर्मच्या लगत अत्यंविधी केल्याचे तसेच राख पोत्यात भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यावरून पोहेकॉ जितेंद्र तागवले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे यांच्याविरुद्ध भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.