ETV Bharat / state

भरकटलेल्या शिवसेनेचा मूळ पायाच हरवला; प्रवीण दरेकरांचा निशाणा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवरून टीका केली आहे. हिंदूत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना सत्तेत आल्यावर आपाला पायाच हरवून बसली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

भरकटलेल्या शिवसेनेचा मूळ पायाच हरवला
भरकटलेल्या शिवसेनेचा मूळ पायाच हरवला
author img

By

Published : Nov 22, 2020, 4:27 PM IST

Updated : Nov 22, 2020, 4:59 PM IST

जालना - शिवसेना पक्ष आपला पाया हरवून बसली आहे, आपल्या भूमिकांत पासून दूर जाऊन ती सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज शिवसेनेवर केली आहे. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार निमित्तते आज जालन्यात आले होते. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.

या तीन मुद्द्यांपासून शिवसेना गेली दूर-

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत होती. शिवसेनेसाठी आणि मराठी माणसांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा होता, त्यानंतर हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 80 टक्के समाजकारण म्हणत सामाजिक बांधिलकी जपणारी या तिन्ही महत्वाच्या मुद्द्यांपासून शिवसेना दुरावली आहे. 20 टक्के राजकारण करणारी शिवसेना आता भरकटलेली आहे, गोंधळलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता ही शिवसेनेची जवळ राहिली नाही. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या प्रश्नावर दोन महिन्यांपूर्वी आदित्यनाथ यांचे कौतुक करणारी शिवसेना आज लव्ह जिहादचा धोका नसल्याचे म्हणत आपल्या भूमिकांपासून दूर जाताना दिसत असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे.

भाजपच्या मागणीमुळे मदत -

महिन्याभरापूर्वी याच मतदारसंघात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दौरा करून मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला होता. मात्र आजही शेतकरी वंचित असताना भारतीय जनता पार्टी कुठेही आंदोलन करताना दिसत नाही? असा प्रश्न विचारला असता, दरेकर म्हणाले, शेतकऱ्यांना आज जी मदत मिळाली आहे, ती भारतीय जनता पार्टीच्या रेट्यामुळेच मिळालेली आहे. मिळालेली मदत ती तुटपुंजी आहे. त्यामुळे आता देखील आम्ही गप्प बसणार नाहीत, खरे तर अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलने करायला पाहिजे होती. मात्र शिवसेना या प्रश्नावर देखील आपली भूमिका बाजूला ठेवत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी दरेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुजित जोगस यांचीही उपस्थिती होती.

Last Updated : Nov 22, 2020, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.