ETV Bharat / state

लहान मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला नागरिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन - जालना पोलीस बातमी

जालन्यात लहान मुलींना हेरून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तील नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

One arrest due to physical abuse with miner girl in jalna
लहान मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन
author img

By

Published : Dec 3, 2019, 2:21 AM IST

जालना - सायंकाळच्या सुमारास गल्लीमध्ये खेळणाऱ्या मुलींना हेरून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्या व्यक्तीला नागरिकांनी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. सलीम शेख नजीर (वय 50) असे आरोपीचे नाव आहे.

लहान मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन

जालन्यातील कादराबाद कमान गल्ली भागात राहणाऱ्या संतोष नरसय्या चौकी आणि कॉलनीमधील काही मुली सायंकाळी एकत्र खेळतात. आरोपी चार पाच दिवसांपासून रोज सायंकाळी येऊन लहान मुलींना विशिष्ट प्रकारचे हातवारे करून आणि अश्लील चाळे करून जवळ बोळतव होता. ही बाब मुलींनी पालकांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, पालकांनी ही घटना दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना रविवारी सांगितली होती. सोमवारी पुन्हा या मुली खेळत असताना शेख सलीम तिथे आला आणि मुलींना इशारे करू लागला. मुलींनी पालकांना त्या व्यक्तीबद्दल पालकांना सांगितले.

त्यामुळे मुलींच्या पालकांनी परिसरातील नागरिकांच्या कानावर ही घटना घातली. नागरिकांनी देखील त्यांच्या मुलींना या घटनेविषयी विचारले असता सर्वच मुलींनी हा प्रकार घडत असल्याचे सांगितले. ही व्यक्ती आजही तीथे आली आहे, आमि कोपऱ्यात उभी आहे, असहेही सांगितले. त्यानंतर कॉलनीतील नागरिक जमा झाले आणि त्यांनी शेख सलीम याला विचारणा केली.
पालकांनी मुलींकडून त्या व्यक्तीबद्दल शहानिशा केली असता, सर्व मुलींनी त्या व्यक्तीबद्दल तक्रार केली. पालकांनी त्याला पकडून जाब विचारला असता त्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. अचानक त्या व्यक्तीने पळून जाण्याचाही प्रयत्न केला असता, उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुलींच्या पालाकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख सलीम शेख नजीर (वय 51) याच्यावर गुन्हा दाखल करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. आरोपीवर अत्याचार अधिनियम 2012 आणि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:लहान मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन; गुन्हा दाखल

सायंकाळच्या सुमारास गल्लीमध्ये खेळणाऱ्या मुलींना हेरून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या 50 वर्षीय इसमाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला. आणि मध्ये पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना 8 वाजेच्या सुमारास घडली.
जालन्यातील कादराबाद, कमान गल्ली भागात राहणाऱ्या संतोष नरसय्या चौकी यांची आणि कॉलनीमधील काही मुली सायंकाळी एकत्र खेळतात .त्यांना हेरून शहीद भगतसिंग चौक खांडसरी येथे राहणारा सलीम शेख नजीर वय 50 , हा व्यक्ती गेल्या चार-पाच दिवसांपासून रोज सायंकाळी येऊन लहान मुलींना विशिष्ट प्रकारचे हातवारे करून आणि अश्लील चाळे करून जवळ बोलावत होता. ही बाब संतोष चौकी यांच्या लहान मुलीने मोठ्या मुलीला सांगितली आणि मोठ्या मुलीने त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर संतोष यांनी ही घटना दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना काल सांगितली होती . आज पुन्हा या मुली खेळत असताना शेख सलीम तिथे आला आणि मुलींना इशारे करू लागला .मुलींनी आज तो आल्याचे आपल्या पालकांना सांगितले संतोष चौकी यांनी परिसरातील नागरिकांच्या कानावर ही घटना घातली, त्या नागरिकांनीदेखील त्यांच्या मुलींना या घटनेविषयी विचारले असता सर्वच मुलींनी हा प्रकार घडत असल्याचे सांगितले तसेच. सदरील व्यक्ती आजही इथे आला आहे आणि कोपऱ्यामध्ये उभा आहेअसेही सांगितले. त्यानंतर कॉलनीतील नागरिक जमा झाले आणि शेख सलीम याला विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली .आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र नागरिकांनी त्याला तिथेच आडवून चांगला चोप दिला आणि तसाच परिस्थितीमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्यात आणले. नंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शेख सलीम शेख नजीर याला शासकीय रुग्णालयात पाठविले, दरम्यान संतोष चौकी आणि अन्य काही नागरिकांच्या तक्रारीवरून शेख सलीम शेख नजीर याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियम 2012 तसेच भारतीय दंड विधान कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:विजवलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.