जालना - शुक्रवारी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. याला हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला विरोध आणि गोंदेगाव येथे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तरुणाईच्या आवडत्या ठिकाणी पोलीस विशेष बंदोबस्त ठेवणार आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून समाजात चुकीची प्रथा रूढ होत आहे. हा प्रकार समाजासाठी घातक आहे, असा समाज हिंदुत्ववादी संघटनांचा आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला त्यांचा कडाडून विरोध आहे. दरवर्षी 14 फेब्रुवारीला या संघटनांकडून तरुणाईला त्रास दिला जातो. अनेक वेळा मारहाणीच्या घटनाही होतात. या घटना टाळण्यासाठी जालन्यातील पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. शहरातील मोती तलाव आणि इतर काही ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्ताची सोय केली आहे.
हेही वाचा - चर्चा तर होणारच...चक्क सलूनमध्येच उभारलं 'वाचनालय'
काही दिवसांपूर्वीच जालन्यातील गोंदेगाव येथे प्रेमीयुगुलाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणातील मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.