ETV Bharat / state

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; राजेश टोपेंनी दिलगिरी व्यक्त करत न्यासा संस्थेवर फोडले खापर - nyasa institute coduct exam

न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपेंकडून दिलगिरी
राजेश टोपेंकडून दिलगिरी
author img

By

Published : Sep 25, 2021, 7:56 AM IST

Updated : Sep 25, 2021, 9:57 AM IST

मुंबई/जालना - आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकल्याचे त्यांनी न्यासा या संस्थेवर परीक्षा रद्द होण्याचे खापर फोडले आहे. न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सरकारच्या या गोधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

न्यासाने घातला तांत्रिक गोंधळ-

आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित केली. परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षा केंद्र जाहीर केले. परीक्षेच्या आदल्या दिवशीच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन ओळखपत्र डाऊनलोड करुन घेताना अडचण येत होती. तर अनेकांना इ-मेलवर चुकीचे ओळखपत्र आले होते. हॉल तिकीटमध्ये संबंधित एजन्सीने गोंधळ घातला होता. विद्यार्थ्यांना या तांत्रिक अडचणींमुळे होणाऱ्या त्रासामुळे ही घातलेल्या गोंधळामुळे अखेर ही परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपेंकडून दिलगिरी; न्यासा संस्थेवर फोडले खापर

न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे

न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले. परीक्षेची जबाबदारी न्यासाची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्याचेही टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6 हजार 200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र न्यासाकडे परीक्षेची सर्व जबाबदारी असताना न्यासा जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरली असे सांगायलाही टोपे विसरले नाहीत.

सरकार काय कारवाई करणार?

परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही. अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही. प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही. दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य होते. संकेतस्थळ अनेकदा हँग होत होते. या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच आरोग्यमंत्री टोपे यांनी न्यासावर खापर फोडल्याने आता सरकार न्यासा या कंपनीवर काय कारवाई करणार? असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटनांकडून विचारला जातो आहे.

आरोग्य विभागातील या पदासठी भरती१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदीसार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्जगट क : २७२५ : ४,०५,०००

हेही वाचा - नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं होणार खुली; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

हेही वाचा - UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण

Last Updated : Sep 25, 2021, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.