जालना- परदेशातून परतल्यानंतर जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती न देता स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय जालन्यातील एका डॉक्टरने सुरू केला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी डाॅक्टरला नोटीस बजावली आहे. डॉ. गौतम रुणवाल असे डाॅक्टराचे नाव आहे.
हेही वाचा- COVID-19 LIVE : देशात २२३ रुग्ण, तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२..
डॉ. रुणवाल यांचे भोकरदन नाका नगर परिसरात रुग्णालय आहे. रुणवाल हे नुकतेच परदेशातून आले आहेत. त्यांनी याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. मात्र, रुणवाल यांनी कोणतीही तपासणी केली नाही. तसेच त्यांचा व्यवसायही सुरू केला. याबाबत काही रुग्णांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुणवाल यांना नोटीस बजावली आहे. त्यांना तपासणी न करण्याचा खुलासा मागण्यात आला आहे.