जालना - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षांपासून अडकलेल्या एका खटल्याचा निकाल लावण्यात आला. एका विमा कंपनीचाही सुरू असलेला लाखो रुपयांचा वाद मिटवण्यात आला.
वीस वर्षांपूर्वी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील कैलास फकिरचंद जाधव, शारदा बबन जाधव, मिनाबाई अशोक जाधव यांनी महाराष्ट्र शासनासह अन्य सोळा जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये उपजिल्हाधिकाऱयांसह दामोदर नारायण जाधव, कौशल्याबाई सर्जेराव जाधव, फकीरचंद सर्जेराव जाधव, सुनील उत्तमचंद लाहोटी, महेश सारस्वत, चंद्रकला अग्रवाल असे सोळा प्रतिवादी होते. मागील वीस वर्षांपासून न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तरीही या प्रकरणाचा निकाल लागत नसल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू'
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. या सोबत अन्य एका प्रकरणात विमा कंपनीसोबत सुरू असलेला वाद मिटवून मयताच्या वारसाला रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात. या सारखे अनेक खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले.
या लोक अदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पारवेकर, जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी, एफ. एम. खाजा, एस. एस .पल्लोड, एम. वाय. डोईफोडे हे उपस्थित होते.