ETV Bharat / state

जालन्यात शेतात कापसाची राखण करणाऱ्या तरुणाचा झोपेत खून - वारकरी संप्रदाय

जालना शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर दुधना काळेगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच अमोल म्हस्के यांचे घर आहे. आणि त्यांची शेती त्यांच्या घरापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पाण्यावर लावलेली सरकी आता जमिनीच्यावर आली आहे. त्यामुळे ही कोवळीपिके परिसरात असलेली हरणे, आणि इतर प्राणी खाऊन नासधूस करतात. त्यामुळे अमोल म्हस्के हा गोठ्यामध्ये न झोपता साडे दहा वाजताच्या सुमारास शेतात झोपण्यासाठी गेला होता.

मृत अमोल नारायण म्हस्के.
author img

By

Published : Jun 20, 2019, 6:19 PM IST

जालना - कापसाचे पीक जमिनीच्यावर आल्यानंतर रानटी प्राण्यांपासून त्याचे संरक्षण करावे लागते. पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये उघड्यावर झोपलेल्या 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अमोल उर्फ नारायण मस्के (वय २५, रा. दुधना काळेगाव, ता. जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जालन्यात शेतात कापसाची राखण करणाऱ्या तरुणाचा झोपेत खून

जालना शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर दुधना काळेगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच अमोल म्हस्के यांचे घर आहे आणि त्यांची शेती त्यांच्या घरापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पाण्यावर लावलेली सरकी आता जमिनीच्यावर आली आहे. त्यामुळे ही कोवळीपिके परिसरात असलेली हरणे, आणि इतर प्राणी खाऊन नासधूस करतात. त्यामुळे अमोल म्हस्के हा गोठ्यामध्ये न झोपता साडे दहा वाजताच्या सुमारास शेतात झोपण्यासाठी गेला होता. पहाटे त्याचा फोन उचलला गेला नाही आणि काही निरोप आला नाही. त्यामुळे त्याच्या जोडीदाराने बाजावर झोपलेल्या अमोलला जाऊन हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्यामुळे खून झाला असल्याचे निदर्शनास आले .

Dead amol narayan mhaske
मृत अमोल नारायण म्हस्के.

दरम्यान, जालना तालुका पोलिसांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. शेजारीच असलेल्या गोठ्यापर्यंत हे श्वान पथक गेले आणि परत आले. संशयाच्या आरोपावरून पोलिसांनी या गोठा मालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, जप्त केले आहेत. मृत अमोल कोल्हेच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न -

अमोल उर्फ पप्पू म्हस्के याचा दुधना काळेगाव या गावापासून जवळच असलेल्या सामनगाव येथील मुलीशी तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अमोलचे वडील नारायणराव मस्के हे आषाढी वारीसाठी गावातीलच एका दिंडीसोबत पंढरपूरकडे निघाले होते. रस्त्यात रांजणगाव जवळच त्यांना ही दुःखद घटना कळविण्यात आली. आणि तेथूनच या वारकऱ्यांचे पाय घराकडे परतले. त्यांचा संपूर्ण परिवार वारकरी संप्रदायाचे आहे.

बाजेवरच नेला मृतदेह -

खाली जमिनीवर उभ्या पिकाच्या बाजूलाच बाज टाकून झोपलेल्या अमोलचा बाजेवर खून करण्यात आला. शेताच्या मध्यभागी असलेल्या या घटनास्थळापर्यंत कोणतेही वाहन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये बाजेसह अमोलचा मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत रुग्णवाहिकापर्यंत आणण्यात आला.

Intro:कापसाचे पीक जमिनीच्या वर आल्यानंतर रानटी प्राण्यांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये उघड्यावर झोपलेल्या 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. अमोल उर्फ नारायण मस्के वय 25 ,राहणार दुधना काळेगाव, तालुका जालना, असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

Body:जालना शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर दुधना काळेगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच अमोल म्हस्के यांचे घर असून याच घरापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची शेतीही आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पाण्यावर लावलेली सरकी आता जमिनीच्या वर आले आहे. त्यामुळे ही कोवळीपिके परिसरात असलेली हरणे ,आणि इतर प्राणी खाऊन नासधूस करतात त्यामुळे अमोल म्हस्के हा गोठ्यामध्ये न झोपता या पिकांच्या शेजारीच बाज टाकून रात्री झोपी गेला होता. साडे दहा वाजताच्या सुमारास तो शेतात झोपण्यासाठी गेला होता. पहाटे त्याचा फोनही उचलला गेला नाही, आणि काही निरोप आला नाही ,त्यामुळे त्याच्या जोडीदाराने बाजावर झोपलेल्या अमोल ला जाऊन हलविण्याचा प्रयत्न केला मात्र तो रक्ताच्या थारोळ्यात लतपत पडलेला असल्यामुळे खून झाला असल्याचे निदर्शनास आले .
दरम्यान जालना तालुका पोलिसांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी खिरडकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली, तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. शेजारीच असलेल्या गोठ्या पर्यंत हे श्वान पथक गेले आणि परत आले. दरम्यान संशयाच्या आरोपावरून पोलिसांनी या गोठ्या मालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, जप्त केले आहेत. अमोल कोल्हे च्या कपाळावर धारदार शस्त्राने मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. अमोल चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
* तीन महिन्यापूर्वीच झाले होतेलग्न*
अमोल उर्फ पप्पू म्हस्के याचा दुधना काळेगाव या गावापासून जवळच असलेल्या सामनगाव येथील मुलीशी तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. अमोल चे वडील नारायणराव मस्के हे आषाढी वारीसाठी गावातीलच एका दिंडीसोबत पंढरपूर कडे निघाले होते. रस्त्यात रांजणगाव जवळच त्यांना ही दुःखद घटना कळविण्यात आली .आणि तेथूनच या वारकऱ्याचे पाय घराकडे परतले .पूर्ण घर वारकरी संप्रदायाचे आहे.
* बाजेवरच नेला मृतदेह*
खाली जमीन वर ती आकाश अशा परिस्थितीत उभ्या पिकाच्या बाजूलाच बाज टाकून झोपलेल्या अमोलचा बाजेवर खून करण्यात आला शेताच्या मध्यभागी असलेल्या या घटनास्थळापर्यंत कोणतेही वाहन जाणे शक्य नव्हते, त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये बाजेसहज अमोल चा मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत रुग्णवाहिका पर्यंत आणण्यात आला

.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.