ETV Bharat / state

Murder For Fish Curry : धक्कादायक : माशाचे कालवण दिले नाही म्हणून खून - Murder For Fish Curry

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामटेकडी वस्ती पिंपरखेडा बुद्रुक या ठिकाणी जेवणात मासे वाढले नाही म्हणून खून केल्याची घटना ( Murder for not giving fish curry in jalna ) घडली आहे. खून झालेल्या 65 वर्षीय वृद्धाचे नाव मारोती होनाजी नरोटे असे आहे.

Murder For Fish Curry
घनसावंगी पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 29, 2022, 12:34 PM IST

जालना - घनसावंगी तालुक्यातील रामटेकडी वस्ती पिंपरखेडा बुद्रुक या ठिकाणी जेवणात मासे वाढले नाही म्हणून खून केल्याची घटना ( Murder for not giving fish curry in jalna ) घडली आहे. खून झालेल्या 65 वर्षीय वृद्धाचे नाव मारोती होनाजी नरोटे असे आहे. आरोपीने त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना जमिनीवर आपटले व लोखंडी फुकणीने वार करून खून केला.

पोलीस निरीक्षकाची प्रतिक्रिया

माशाचे कालवण दिले नाही म्हणून वाद - रविवार असल्याने मयत मारोती होनाजी नरोटे, त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांनी मासे खाण्याचा बेत आखला होता. त्यांनी मासे आणून भाजी तयार करून जेवत असताना त्याठिकाणी आरोपी पांडुरंग ज्ञानेदेव हांगे हा आला. मला पण मासे खायचे असे त्यांनी म्हणताच. मयत मारोती आणि त्यांच्या पुतण्याने मासे तिघांपुरते असल्याचे म्हणाले. आरोपी पांडुरंग याने वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण करण्यास केली. त्याने जवळ असलेल्या लोखंडी फुकणी आणि लाकडाच्या मारोती होनाजी नरोटे, त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांना जबर मारहाण केली.

गुन्हा दाखल - आरोपीने केलेल्या मारहाणीत मारोती होनाजी नरोटे यांचा मृत्यु मृत्यू झाला. तर मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी सुशिलाबाई मारुती नरोटे या खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारी वरून आरोपी पांडुरंग ज्ञानेदेव हांगे यांच्या विरुद्ध जबर मारहाण करून खून केल्या प्रकरणी भादवी 302, 324, 506 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा - खुशखबर..! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग होणार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.