ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन

जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन करावे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज (सोमावर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले.

JALNA
author img

By

Published : Feb 18, 2019, 8:16 PM IST

जालना - जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन करावे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज (सोमावर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले.

JALNA
undefined

यावेळी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सरकारने दुष्काळ जाहीर करून साडेतीन महिने झाले तरी दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अमलबजावणी होत नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील विविध तहसीलदारांना निवेदन देऊन माहिती मागितली होती पण ती अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या साहित्याची प्रत मराठीमध्ये उपलब्ध करून द्यावी, दुष्काळ भागात असलेल्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, रोहयो मनरेगा अंतर्गत ज्या गावांमध्ये बेरोजगार तरुणांना कामे नाहीत त्यांचे जॉब कार्ड तयार करून काम देण्याची मोहीम सुरू करावी, पाण्याचे टँकर सुरू करावेत, चारा छावणी सुरु करावी यासह आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

या निदर्शनांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, बळीराम खटके, प्रकाश सोळंके, यांच्यासह सूर्यकांत कलशेट्टी, दिलीप राठोड, बाळू जाधव, संतोष मोठे, भारत शेळके, पंडित पाटील, शरद खरात, मनोज देशमुख, दीपक तवर, वैजनाथ बान, फारूक कुरेशी, महेश नागवे, अविनाश नाईक, ज्ञानेश्वर कातुरे, गजानन पाटील-सरडे, भाऊसाहेब खंडारे आदी उपस्थित होते.

Intro:विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन

Body:
जनावरांच्या ारा-पाण्याचा प्रश्‍न सोडवावा ,दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन करावे, या आणि अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

Conclusion:वरील मागण्यांसह पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच सरकारने दुष्काळ जाहीर करून साडेतीन महिने झाले तरी दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 प्रमाणे प्रभावी अमलबजावणी होत नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील विविध तहसीलदारांना निवेदन देऊन याची माहिती मागितली होती .मात्र ती अद्याप पर्यंत मिळालेले नाही .त्यामुळे या सहित्याची मराठीमध्ये प्रत उपलब्ध करून द्यावी .दुष्काळ भागात असलेल्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, रोहयो मनरेगा अंतर्गत ज्या गावांमध्ये बेरोजगार तरुणांना कामे नाहीत त्यांचे जॉब कार्ड तयार करून काम देण्याची मोहीम सुरू करावी, पाण्याचे टँकर सुरू करावेत, चारा छावणी सुरु करावी, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. या निदर्शनांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते ,बळीराम खटके, प्रकाश सोळंके, यांच्यासह सूर्यकांत कलशेट्टी ,दिलीप राठोड, बाळू जाधव ,संतोष मोठे, भारत शेळके, पंडित पाटील, शरद खरात, मनोज देशमुख ,दीपक तवर, वैजनाथ बान ,फारूक कुरेशी ,महेश नागवे, अविनाश नाईक, ज्ञानेश्वर कातुरे ,गजानन पाटील सरडे, भाऊसाहेब खंडारे, आदींची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.