जालना - औद्योगिक वसाहतीमधील एल. जी. बी. ब्रदर्स कंपनीतील कामागारांनी संप पुकारला होता. मात्र, काही कामगार कामावर आले असता मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन फोडले. तसेच त्या कामगारांना पिटाळून लावले.
हे वाचलं का? - शहीद हेमंत करकरेंच्या कन्येने पुस्तकातून उलगडले बहुआयामी व्यक्तीमत्व
नवीन औद्योगिक वसाहतीमधील फेज-3 मध्ये असलेल्या एल. जी. बी. ब्रदर्स कंपनीत गेल्या १५ दिवसांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. आतापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने सव्वाशे कामगारांनी संप पुकारलेला आहे. त्यामुळे कंपनी सध्या दुसऱ्या युनिटमधून कामगार आणून काम करीत आहे . आज एका जीपमध्ये हे कामगार येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जालना औरंगाबाद रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ही गाडी अडविली. या गाडीमधील कामगारांना पिटाळून लावले. तसेच त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडल्या. या प्रकारामुळे कामगार आणि मनसेचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. दरम्यान, चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे हे घटनास्थळावर तळ ठोकून आहेत.