ETV Bharat / state

...तर मीही आदित्य ठाकरेंसोबत आयोध्येला जाईल - रोहित पवार - आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी सरकार 3 महिन्यात कोसळेल, असे भाकीत विरोधक ( opposition ) वर्तवत होते. मात्र, आज या सरकारला 3 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचे रोहित पवार यांनी ( MLA Rohit Pawar ) स्पष्ट केले.

रोहित पवार
रोहित पवार
author img

By

Published : Apr 16, 2022, 9:58 PM IST

जालना - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी ( opposition ) टिका करणे सुरू केले असले तरी आमदार रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar ) मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. निमंत्रण आल्यास मीही आदित्य ठाकरेंसोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जातेय - काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केले जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election ) आयोग डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचे रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar ) म्हटले आहे.

तिकीट हवे असेल म्हणून राणांनी भूमिका बदलली असावी - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचे पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवे असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. शिवाय निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला बसले, असा आरोपही त्यांनी केला.

आघाडीतील कोणतेही उमेदवारी भाजपच्या संपर्कात नाही - महाविकास आघाडी सरकार 3 महिन्यात कोसळेल, असे भाकीत विरोधक वर्तवत होते. मात्र, आज या सरकारला 3 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा जालन्यात अपघात; कोणतीही इजा नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.